सविताची प्रतिकूल परिस्थिती व अपंगत्वावर मात

अमित गवळे
सोमवार, 18 जून 2018

पाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील साजे आदीवासीवाडी जवळ राहणारी सविता जाधव ही अपंग होतकरु अादिवासी विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. प्रतिकुल अार्थिक परिस्थिती व अपंगत्वावर मात करत सविताने हे यश संपादित केले आहे.

पाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील साजे आदीवासीवाडी जवळ राहणारी सविता जाधव ही अपंग होतकरु अादिवासी विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. प्रतिकुल अार्थिक परिस्थिती व अपंगत्वावर मात करत सविताने हे यश संपादित केले आहे.

विळे येथील हि. म. मेता माध्यमिक विदयालयात शिकत होती. सविता जाधवचे दोन्ही पायाचे तळवे जन्मतःच वाकडे अाहेत. ते समोरासमोर नव्वद अंशात वळलेले अाहेत. घरची परिस्थिती बेताची, हातावर पोट असणारे कुटूंब. पोरीच्या भविष्याच्या चिंतेने सगळेच चिंतातूर. मग अाजोबा गणपत जाधव व अाजी सुंदर जाधव यांनी पोरीला शिकवून स्वतःच्या पायावर उभी करुन स्वावलंबी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. जिवाचे रान करुन येईल त्या अडचणींवर मात करत सविताला दहावी पर्यंत म्हणजे अायुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर अाणून ठेवले. सविताने देखिल अापली मेहनत, चिकाटी, जिद्द अाणि परिश्रमाच्या बळावर यश संपादित केले. तिला 46.40 टक्के मिळाले असले तरी एकंदरीतच तीची खडतर परिस्थिती पाहता तिने मिळविलेले हे यश थोडे नव्हे. ती अाता याच शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेणार आहे. सकाळने सविताच्या या प्रेरणादायी संघर्षाची माहिती या अाधी सर्वांसमोर अाणली होती.

सविता अतिशय प्रामाणिक, मेहनती व होतकरु मुलगी अाहे. अापला अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर तीने यश संपादित केले आहे. तिच्या भावी अायुष्यासाठी शाळेच्या वतीने खूप शुभेच्छा.
- प्रमोद बहादुरवाडीकर, विज्ञान शिक्षक, हि. म. मेता माध्यमिक विद्यालय, विळे

Web Title: savita pass in ssc examination in bad condition