‘त्या’ चौघा पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पोलीस अधीक्षकांची कारवाई - दारू व्यावसायिकांशी संबंध असल्याचा आरोप
सावंतवाडी - खाकीवाल्याचे संबंध दारु व्यावसायिकांचे असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाई टिळवे यांनी तक्रार केल्यानंतर बांदा आणि सावंतवाडी येथील चौघा पोलिसांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकाराची चौकशी करण्याच्या सुचना अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड यांना दिल्या असुन चौकशीअंती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची माहीती कायदेशीर तपास झाल्यानंतर आपण देवू अशी माहीती पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी सांगितले.

तालुक्यातील पारपोली येथील ट्रक ड्रायव्हर असलेल्या संभाजी सावंत यांना पंढरपुर येथील दोघांकडुन दारु वाहतूक प्रकरणात लुटण्यात आले होते. तसेच त्यांना रिव्हॉल्वर लावून त्यांची गाडी पळवून नेण्यात आली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्री. टिळवे यांनी येथील पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. या प्रकरणात आंबोली दुरक्षेत्रावर कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍या समवेत बांदा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघा कर्मचार्‍यांचा समावेश होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी श्री. टिळवे यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. गेडाम यांनी याबाबत प्राथमिक दर्शनी या प्रकरणात चौघा पोलिसांवर संशयाची सुरी ठेवली असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार त्या चौघांची आज तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

याबाबतची माहीती श्री. गेडाम यांनी दिली. ते म्हणाले, “या प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असलेल्या त्या चौघा कर्मचार्‍यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री. गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यातील बांदा आणि सावंतवाडीत काम करणारे ते पोलिस असुन तपासाच्या दृष्टीने संबधितांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तसेच या प्रकरणात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.”

पंढरपुरचे दारु व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर
याबाबत श्री. गेडाम म्हणाले, “श्री. टिळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणातील पंढरपुर येथील ते दोघे दारु व्यावसायिकांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यात काही चुकीचे होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.”
 
अवैध धंद्याविरोधात मोहिम तीव्र
गेले महिनाभरात पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम हे सरकारी कामानिमित्त बाहेर असल्याने ते जिल्ह्यात नसल्याचा फायदा अवैध धंदेवाल्यांनी घेवून जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारु विक्रीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस अधिक्षक गेडाम जिल्ह्यात दाखल होताच अवैध धंद्या विरोधात मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Web Title: sawantwadi konkan news 4 police immediate transfer