‘रोजगार’चा लाभ शेतकऱ्यांनाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी लहान व सिमांत शेतकरी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचे शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ देता येवू शकतो, असा हिरवा कंदील शासनाकडून दिला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता आहे.

याबाबतची चर्चा भाजपकडून आयोजित केलेल्या शिवार संवाद कार्यक्रमात झाली होती. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा फायदाच मिळत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. याबाबत माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.

नुकत्याच भाजपतर्फे आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात या विषयावर चर्चा झाली. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोजगार योजनेतून गवत कापणी, शेतीची कामे केली जातात; परंतु ती न मोजता येणारी आहेत.

यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. याबाबत योग्य ती भूमिका घेवून त्या योजनेत दुसरी कामे घेण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार श्री. तेली यांनी मागणीबाबत शासनाकडे पत्र दिले होते. याबाबत कक्ष अधिकारी गीता कुळवंत यांनी माहिती दिली. त्या पत्रात दिलेल्या  माहितीनुसार रोजगार हमी योजनेत शेतीला पुरक अशा कामाचा समावेश आहे. यात जलसंधारणाची कामे, जलसिंचन कालव्याची कामे, भुविकासाची कामे तसेच कपोस्टींग गांडुळ खत, जैविक खत तयार करणे आदी कृषी विषयक कामाचा समावेश आहे. ही कामे अनुसुचित जाती जमाती दारिद्य्र रेषेखालील व्यक्ती इंदीरा आवाज योजनेचे लाभार्थी लहान व सिमांत शेतकरी यांच्या शेतावर घेता येतील. शेतीची आंतरमशागतीची कामे केंद्र शासनाच्या तत्वानुसार उत्पादन स्वरुपाची नसल्यामुळे ती या योजनेत घेणे शक्‍य नाही.

आता रोजगार योजनेतून कामे होणार असल्यामुळे वंचित शेतकऱ्यांचा प्रश्‍न सुुटणार आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे. आम्ही ही योजना नरेगा योजनेत घेण्याची मागणी केली होती; परंतु त्या ऐवजी रोजगार हमी योजनेचा पर्याय देण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांना मान्य आहे.
- राजन तेली

Web Title: sawantwadi konkan news employment scheme profit to farmer