राणे मंत्री झाल्यास जिल्ह्याला अच्छे दिन - बबन साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद द्यायलाच हवे. आता पुन्हा एकदा जिल्ह्याला चांगले दिवस येणार आहेत,’ असा आशावाद शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे. 

श्री. साळगावकर हे गृह राज्यमंत्री तथा राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या दीपक केसरकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात; मात्र शिवसेनेत असताना श्री. साळगावकर यांनी राणेंसोबत काम केले आहे. राणे आणि साळगावकर यांचे आजही चांगले संबंध आहेत. यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत.

त्यांनी आज येथील पाटेकर देवस्थानात माजी आमदार शिवराम दळवी यांच्याकडून आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली. या वेळी श्री. दळवी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आपले मत मांडले. खरेच जिल्ह्याला अच्छे दिन येतील आणि अनेक जिल्हावासीयांचे तसे मत असल्याचे त्यांनी 
सांगितले.

काँग्रेस नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अंतिम मानला जात आहे. येत्या २७ ला त्यांचा भाजप प्रवेश असल्याची चर्चा आहे. रविवार (ता. २०) येथे दौऱ्यानिमित्त आलेल्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राणेंना आपले मंत्रिपद देण्याची माझी तयारी आहे; परंतु त्यांचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही, असे वक्तव्य केले होते. 

दुसरीकडे श्री. राणे यांचा भाजप प्रवेश होणार असल्यामुळे तसेच पुन्हा एकदा सत्ता चाखायला मिळणार आहे. त्यामुळे राणे समर्थकांतही चैतन्याचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर आज श्री. साळगावकर यांनी दळवी यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्याला आता अच्छे दिन येणार आहेत. राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे आणि त्यांना मंत्रिपद मिळाल्यास माझ्यासह असंख्य जिल्हावासीयांना आनंद होईल, असा विश्‍वास श्री. साळगावकर यांनी व्यक्त केला. या वेळी मंदार दळवी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाळू गावकर, बाळू परब आदी उपस्थित होते.

संधी मिळाल्यास विधानसभा लढणार
श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘आगामी काळात आपल्याला विधानसभा लढविण्याची संधी मिळाली, तर आपण नक्कीच निवडणूक लढणार आहे.’’

साळगावकरांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावू - दळवी

सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यास आपण कोणत्याही पक्षात असलो तरी या मतदारसंघात ठाण मांडून तन-मन-धन अर्पण करून त्यांचे काम करेन, अशी भावना भाजपचे नेते व माजी आमदार शिवराम दळवी यांनी व्यक्त केले.

येथील श्री देव पाटेकर देवस्थान येथे यावर्षीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवराम दळवी यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना असे व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री देव पटेकरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. १९९८ च्या निवडणुकीत साळगावकर यांनी या मतदारसंघाची ओळख आपल्याला करून दिली. व त्यांच्या लोकसंपर्कामुळे आपला विजय सुकर झाला, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

 ते म्हणाले, ‘‘गेली दहा वर्षे ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष आहेत. स्वच्छ चरित्र संपन्न नगराध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा राजकारणातील अनुभव पाहता त्यांना कोणत्याही पक्षाने आमदारकीची उमेदवारी दिल्यास मी त्यांचा प्रचार करण्यासाठी या मतदारसंघात ठाण मांडून बसेन.’’

Web Title: sawantwadi konkan news If Rane becomes minister, good day in the district