सावंतवाडी पालिकेची परीक्षा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सावंतवाडी - स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सावंतवाडी पालिकेची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. ३ दिवस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी होणार आहे. याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. आज दाखल झालेल्या अधिकाऱ्यांकडून रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. उद्या (ता. १८) शहराची पाहणी तर १९ ला नागरिकांना प्रश्‍न विचारले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी दिली.

येथील पालिकेच्या परीक्षणासाठी आज स्वच्छ सर्वेक्षण समितीचे सदस्य धीरज ढोणे आणि समन्वयक निनाद भागवत हे दोघे शहरात दाखल झाले. सकाळच्या सत्रात त्यांनी पालिकेत असणाऱ्या रेकॉर्डची पाहणी केली. उशिरापर्यंत पाहणी सुरू होती. याबाबत समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी समितीच्या सदस्याचे स्वागत केले. या वेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, अनारोजीन लोबो, भारती मोरे आदी उपस्थित होते. या वेळी समिती सदस्य श्री. ढोणे यांनी मुख्याधिकारी द्वासे यांच्याशी चर्चा केली. या वेळी पालिकेचे अभियंता तानाजी पालव, भाऊ भिसे, आसावरी शिरोडकर आदी उपस्थित होते.

आता नागरिकांचीच जबाबदारी 
मुख्याधिकारी द्वासे म्हणाले, ‘‘येथे दाखल झालेल्या समितीने आज रेकॉर्ड तपासले. उद्या (ता. १८) शहराची तपासणी होणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी नागरिकांना प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या वेळी नागरिकांचीच भूमिका महत्त्वाची आहे. निवडलेल्या सहा प्रश्‍नांपैकी कोणतेही प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्याची सकारात्मक उत्तरे नागरिकांकडून अपेक्षित आहेत.

सावंतवाडी शहर स्वच्छ आहे. व्यापारी तसेच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेला आपलेसे करीत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे सावंतवाडीला संधी आहे; मात्र त्यासाठी आता नागरीकांनी समिती सदस्यांना सकारात्मक उत्तरे देण्याची गरज आहे.
- निनाद भागवत, कोकण समन्वयक स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीम

Web Title: sawantwadi konkan news municipal exam start