सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

सावंतवाडी - शहरात लाल रंगाचा नानेटी प्रकारातील साप आढळला. तो दुर्मिळ असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ललित घाडी याला सैनिक मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात हा साप आढळला.

सावंतवाडी - शहरात लाल रंगाचा नानेटी प्रकारातील साप आढळला. तो दुर्मिळ असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ललित घाडी याला सैनिक मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात हा साप आढळला.

दोडामार्ग-शिरंगे येथील ललित बी. एस. बांदेकर फाइन आर्ट महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याला प्राण्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे. काल दुपारी तो वसतिगृहात असताना वसतिगृहाच्या परिसरात तेथील काही विद्यार्थ्यांना लाल रंगाचा नानेटी प्रकारातील साप दिसला. याबाबतची माहिती ललित याला मिळाल्यानंतर त्याने आपल्या प्राणीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मित्रांशी संपर्क साधून माहिती घेतली. या वेळी फिकट रंगाचा नानेटी साप असतो; मात्र गडद लाल रंगाचा असा साप अद्यापपर्यंत दिसलेला नाही. तो दुर्मिळ आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

यानुसार ललित याने तो साप पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. दुर्मिळ असल्यामुळे त्या जातीचे संशोधन करण्याची त्यांनी मागणी केली आहे. याबाबतची माहिती आज ललित याने "सकाळ'ला दिली. ते म्हणाले, 'अशाप्रकारे गडद लाल रंगाचा साफ मिळाल्याचे ऐकीवात नाही. मला उपलब्ध झालेल्या माहितीत फिकट रंगाचे नानेटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.''

हा साप दुर्मिळ आहे. घनदाट जंगलात राहत असल्यामुळे त्याचा रंग गडद होतो. इतर ठिकाणी आढळणाऱ्या या जातीच्या सापाचा रंग गडद लाल असतो. पश्‍चिम घाटात हे साप आढळतात; मात्र त्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे त्यांचे छायाचित्र किंवा माहिती जास्त उपलब्ध नाही.'
- रवी लोहिरे, सचिव - वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन, ठाणे

Web Title: sawantwadi konkan news red colour naneti receive