सावंतवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - निरवडे, भंडारवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे एक दुकान व अर्धे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटना घडली तेव्हा घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.

सावंतवाडी - निरवडे, भंडारवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे एक दुकान व अर्धे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटना घडली तेव्हा घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.

येथील रहिवासी संजय बागवे व त्यांची पत्नी स्वप्ना हे दोघेही गणेशोत्सवानिमित्त फोंडा येथे गेले होते. ते काल (ता. 27) घरी आले. सकाळी साडेआठच्या सुमारास स्वप्ना या अंगणाच्या बाजूलाच कपडे धुवत होत्या. त्या वेळी घराबाहेर भिंतीवर असलेल्या मीटरमधून मोठा आवाज होऊन आग लागल्याचे त्यांना दिसले. बाजूलाच बंद असलेल्या दुकानात आगीचा भडका उडाल्यामुळे बरीच उपकरणे खाक झाली. त्यांची नवीन दुचाकी; तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत कलेले 40 हजार रुपयांची रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

Web Title: sawantwadi konkan news short circuit in home