गणेशोत्सवाबाबत सावंतवाडी नगराध्यक्षांच्या सूचना, म्हणतात...

 Sawantwadi Mayor Instructions regarding Ganeshotsav
Sawantwadi Mayor Instructions regarding Ganeshotsav

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेताना अकरा तसेच एकवीस दिवसाऐवजी पाच दिवसांचाच गणेश उत्सव साजरा करावा. लहान गणेश मुर्ती बरोबरच गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम व भजनांचे आयोजन करु नये, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केले. 

गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कोरोनाचे संकट मात्र कायम आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण अद्यापही आढळून येत असताना येथील पालिकेने या आजाराचा यशस्वी सामना करत कोरोनाला दुर ठेवले आहे.

गणेश चतुर्थी सणामध्येही या रोगाला दुर ठेवण्यासाठी नगराध्यक्ष परब यांनी आज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक बोलावून चर्चा केली. यावेळी पाणी पुरवठा सभापती नासिर शेख, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, भाजपा शहर उपाध्यक्ष अजय गोंधावळे तर सार्वजनिक गणेश मंडळाचे रघू चितारी, राजन शृंगारे, शरद सुकी, विजय कासार, राजेंद्र भाट, सत्यवान बांदेकर, मनोज रेडकर, गुरुदास पेडणेकर आदी उपस्थित होते. 

परब यांच्या सूचना 
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास शहरवासीयांचा मोठा वाटा 
- गणेश चतुर्थी सण हिंदू धर्मियांचा आवडता सण 
- सार्वजनिक गणेशोत्सव पाच दिवसाच व्हावा 
- दोघांना उचलेल येवढीच गणेश मूर्ती असावी 
- भजने व मनोरजंनात्मक कार्यक्रम, महाप्रदास टाळावा 
- मोठ मोठ्या मिरवणुकाही रद्द कराव्यात 
- घरगुती गणपतीही पाच दिवस पुजा करावी 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com