सावंतवाडी : गाडीमध्ये सुसाईड नोट लिहून बेपत्ता, केला आत्महत्येचा बनाव

आत्महत्येचा बनाव कशासाठी केले हे अद्याप उघड झालेले नसून चौकशी सुरु आहे.
Kokan
KokanSakal

सावंतवाडी : ओटवणे नदी परिसरात आपल्या गाडीमध्ये सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेल्या शहरातील एका खाजगी बँकेचा (Bank) अधिकारी मनोहर गावडे (Manohar Gawde) हा अखेर आज सकाळी घरी परतला असून त्याने आत्महत्या केली नव्हती तर तसा बनाव केल्याचे उघड झाले आहे मात्र त्याने आत्महत्येचा बनाव कशासाठी केले हे अद्याप उघड झालेले नसून चौकशी सुरु आहे.

येथील खाजगी बँक अधिकारी गावडे हा सात दिवसापूर्वी कोणालाही न सांगता बेपत्ता झाला होता त्यानंतर मोबाईल लोकेशन वरून त्याची ओटवणे येथे नदी परिसरात कार आढळून आली या कार ची पडताळणी केली असता त्या कार मध्ये सुसाईड नोट आढळून आली होती त्यामुळे त्याने परिसरातील नदीत आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवत रेस्क्यू टीम ची सहार्याने नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली होती शोध मोहीम राबविल्यानंतर देखील त्याचा मृतदेह आढळून आला नव्हता तर आजूबाजूच्या जंगल परिसरात देखील त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा कुठेच ठावठिकाणा न लागल्याने तो जिवंत असावा असा संशय सावंतवाडी पोलिसांनी बाळगत त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता तो बेपत्ता असल्याचे बॅनर देखील प्रसारित करण्यात आले होते.

Kokan
Belgaum : सक्तीने करण्यात आलेल्या बदल्या अखेर रद्द

दरम्यान, आज सकाळी मनोहर याच्या भावाने फोन करून तो पहाटे घरी आल्याची पोलिसांना माहिती दिली असे सय्यद यांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्याची कारिवडे येथील घरी जात त्याला ताब्यात घेतले सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून सकाळ पासून त्याची कसून चौकशी चालू आहे याबाबत तपस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासिक अंमलदार तौफीक सय्यद करत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com