सावंतवाडी : मोती तलावाच्या संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळला

शहरातील तीन मुशीजवळचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळला होता
dam
damsakal

सावंतवाडी : मोती तलावाच्या संरक्षण भिंतीचा आणखी काही भाग आज सकाळी कोसळला. कोसळलेल्या पूर्वीच्या ठिकाणापासून काही अंतरावर पुढे हा भाग कोसळला. एकूणच या नुकसानीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे, तर पालिका प्रशासनाकडून डागडुजीसाठी पाऊले उचलण्यात आली आहेत.

शहरातील तीन मुशीजवळचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळला होता. या ठिकाणी तलावातील गाळ काढताना तो चुकीच्या पद्धतीने काढला गेल्याने हा प्रकार उद्धवला आहे. आज पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयासमोर फूटपाथच्या कठड्यासह संरक्षण भिंत कोसळली. यामुळे नजीकच्या महामार्गाचा प्रश्न समोर आला असून, महामार्गाला धोका उद्भवू शकतो, असे बोलले जात आहे.

मात्र, या संरक्षण भिंतीच्या आतील भागात जुनी संरक्षण भिंत असल्याने महामार्गाला भीती नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, याठिकाणी तत्काळ उपाययोजना न आखल्यास तलावाच्या संरक्षण भींतीचा काही भाग अजून कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाकडून त्याठिकाणी जाण्यास बंदी घातली असून, कोसळलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत व काम हाती घेण्यासाठी जोरदार पाऊले उचलली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com