अखेर केसरकरांच्या मध्यस्थीने उपोषण मागे....

City President Electricity Distribution Fasting In Savantwadi Kokan Marathi News
City President Electricity Distribution Fasting In Savantwadi Kokan Marathi News

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : शहराच्या अंडरग्राउंड विज वाहिन्याच्या कामाचा परत गेलेला निधी शासन दप्तरी जमा होणार नाही याबाबत संबंधितांचे लक्ष वेधून निधी परत येण्यासाठी पाठपुरावा करणार, असे लेखी आश्‍वासन आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह नगरसेवकांनी पुकारलेले उपोषण मागे घेण्यात आले.

शहरातील एकूण पंधरा किलोमीटर भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करण्यासाठी शासनाकडून अकरा कोटी रुपये येथील वीज वितरण कार्यालयाकडे २०१६ ला प्राप्त झाले होते; मात्र हे काम २०१९ या वर्षाच्या अखेरीपर्यंत मार्गी न लागल्याने निधी मुंबई येथील विज कार्यालयाकडे परत गेला. हे काम लेखी पत्राद्‌वारे नगरपालिकेने नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यास सांगितले असतानाही विज कार्यालयाने संबंधित ठेकेदाराकडून ते काम सुरू न केल्याने हा निधी परत गेला, असा आरोप नगराध्यक्ष परब यांनी पालिकेमध्ये पार पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत केला. 

पुकारलेले उपोषण मागे
हा निधी परत द्या, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण घेण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्‍वभूमीवर श्री. परब यांनी नगरसेवकांसहीत वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण छेडले. 
यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, विरोधी गटाच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, ॲड. परीमल नाईक, सुधीर आडिवरेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, भारती मोरे यांच्यासहित अजय गोंदावळे आधी नागरिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते. माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शवला. या संदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा करणार, असे आश्‍वासनही दिले. 

पैसे पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करू!
माजी पालकमंत्री केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्या, अशी विनंती करत परत केलेले अकरा कोटी रुपये शासन दप्तरी जमा होण्यासाठी आपण पाठपुरावा करू तसेच संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधून हे पैसे पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करू, असे लेखी आश्‍वासन दिले. या विश्‍वासाला दाद देत नगराध्यक्ष श्री. परब यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी श्री. केसरकर व श्री. तेली यांनी श्री. परब यांना एकत्ररित्या पाणी पाजून उपोषण सोडवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com