जिल्ह्यात स्वाईन फ्लूसह डेंगीची लागण; रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - गणेशोत्सवाला आलेल्या चाकरमान्यांकडून डेंगी, मलेरिया आणि स्वाईन फ्लूसारख्या तापसरीचे आजार पुन्हा जिल्ह्यात आल्याचे चित्र आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील अनेकांना सहन करावा लागत आहे.

याबाबत आरोग्य यंत्रणा कमालीची अलर्ट आहे. बाहेरून आलेला रुग्ण अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ त्याच्यावर उपचार केला जात आहे; मात्र रिक्त पदांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ऐन गणेश चतुर्थीच्या सणात स्वाईन फ्लू, डेंगी, मलेरिया आदी तापसरीची लागण होत आहे. शासकीय रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे या रुग्णांनी सद्य:स्थितीत फुल्ल दिसत आहे. सद्य:स्थितीत चतुर्थीच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे आजारी रुग्णांचे प्रमाणे वाढले आहे. हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा फटका अन्य लोकांना सहन करावा लागणार आहे.

याबाबत येथील रुग्णालयात माहिती घेतली असता सद्य:स्थितीत स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंगी आदी तापसरीसोबत अचाकन पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे संबंधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर काही रुग्णांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठवावे लागत आहे.

याबाबत आरोग्य विस्तार अधिकारी के. पी. पाटील म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात वाढलेली तापसरीची साथ लक्षात घेता आरोग्य विभागाकडून गावोगावी कर्मचाऱ्याकडून रुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आढळलेल्या रुग्णात चाकरमान्यांचा जास्त समावेश आहे. त्यामुळे घरातील कुठल्याही व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. कोणाला ताप येत असेल तर तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घेणे आवश्‍यक आहे. तसेच तापसरीची साथ पसरू नये, यासाठी फवारणी तसेच गोळ्या वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पदे रिक्त; पण आम्ही अलर्ट 
याबाबत येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत रुग्णांची संख्या वाढली आहे. तापसरीच्या रुग्णांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. ताप आढळल्यानंतर संबधित रुग्णाला रक्त, लघवी, तपासण्याच्या सुचना देत आहोत. जिल्हाभरात हीच परिस्थिती आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असली तरी कार्यरत असलेले डॉक्‍टर डोळ्यात तेल ओतून आपली सेवा देत आहेत.’’

Web Title: sawantwadi news dengue health