गणेशमूर्तींचे ७० टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

सावंतवाडी - अवघे दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी असलेल्या गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील मूर्तिकार सज्ज झाले आहेत. गेले काही दिवसापूर्वीच ‘श्रीं’च्या मूर्तींना आकार देण्याच्या कामात दंग झाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्यावर्षीच दाखल केलेल्या दरपत्रकाचा मोठा फायदा मूर्तिकारांना झाल्याने यंदा त्याच दरपत्रकानुसार मूर्तीची किंमत आकारण्यात येणार आहे. कोकणातील सर्वात मोठा समजला जाणारा गणेश चतुर्थी सणाला पन्नास दिवस शिल्लक आहेत. 

‘श्री’च्या मूर्तींची तयारी महिन्याभरापूर्वीच सुरू झाली आहे. गेल्यावर्षीच गणेश मूर्तिकार संघातर्फे प्रत्येक मूर्तीच्या आकारा नुसार किंमत आकारणीचे दरपत्रक लागू केले होते.  याला जिल्ह्यातील बऱ्याच मूर्तिकारांनी या दरपत्रकाचे स्वागतही केले होते. गेल्यावर्षी याचा मोठा फायदा मूर्तिकारांना झाल्याने आता यंदाही दरपत्रकानुसार मूर्तीची किंमत आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी श्रींच्या मूर्तीचे जवळपास ७० टक्केच्या आसपास काम झाले आहे. त्यानंतर लवकरात लवकर मूर्ती रंगकामास घेण्यात येणार असल्यामुळे मूर्तिकारांची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा ‘श्रीं’चे आगमन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होत असल्याने लवकरच येत असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाची तयारीला गावोगावी असलेल्या गणेशमूर्तीच्या शाळेत वेग आला आहे.

दरम्यान गेल्यावर्षीपासून बरेच नागरिक प्लॅस्टर ऑफ पॅरिसला नापसंती देताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र काही ठिकाणी अजूनही नागरिक प्लॅस्टर आॅफ पॅरिसमध्ये रुची दाखवत असल्याचे काही मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: sawantwadi news ganesh festival

टॅग्स