गणेश मूर्तीच्या दरावर जीएसटीचा प्रभाव

भूषण आरोसकर
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - कोकणात साजरा होणारा महत्त्वाच्या गणेशोत्सव सणाची तयारीने वेग घेतला आहे. यासाठी मूर्ती शाळेत आता रंगकामाचे वेध लागले आहेत. यंदा गणेशमूर्तीला लागणाऱ्या रंगाच्या दरामध्ये जीएसटीमुळे फरक दिसून येत असून, १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सावंतवाडी - कोकणात साजरा होणारा महत्त्वाच्या गणेशोत्सव सणाची तयारीने वेग घेतला आहे. यासाठी मूर्ती शाळेत आता रंगकामाचे वेध लागले आहेत. यंदा गणेशमूर्तीला लागणाऱ्या रंगाच्या दरामध्ये जीएसटीमुळे फरक दिसून येत असून, १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा मातीच्या गोळ्यामागे झालेली वाढही मूर्तिकारांच्या चिंतेचे कारण बनले आहे. आधीच वाहतूक खर्च, वाढता मजूर वर्ग, मजूरवर्गासोबत त्याचे मोलमजुरी यामुळे मूर्तिकार बरेचसे हवालदिल झाले आहेत. तसेच गोव्यात मूर्तिकारांना असलेली पेन्शन योजना जिल्ह्यातही लागू करावी या मागणीकडेही सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बरीच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पेन्शन योजना लागू केल्यास जिल्ह्यातील मूर्तिकारांना मूर्तिकलेस प्रोत्साहनही मिळेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. सध्या केंद्रशासनाने जीएसटीच्या स्वरूपात नवीन कर आकारणी लागू केली आहे. याचा फारसा फटका मूर्तिकारांना बसत नसला तरी किमतीवर मात्र फरक जाणवत आहे. सद्य:स्थितीत मधल्या टप्प्याचे रंगकाम सुरू आहे. मातीवर जरी जीएसटी लागू नसली तरी मूर्ती रंगविण्यासाठी वापरण्यात येणारे विविध रंगांच्या किमतीवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम बऱ्याच सर्वसाधारण मूर्तिकारावर होत आहे. त्यात जिल्ह्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा होत असलेला शिरकाव मोठी डोकेदुखी बनली आहे. गतवर्षीपेक्षा मातीच्या गोळ्यामागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे परिणामी मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ५० रुपयांनी मिळत असलेला मातीचा गोळा आता ७० तर काही ठिकाणी ८० रुपयांपर्यंत विकला जात होता. यासर्वांचा एकंदरीत केलेला खर्च मूर्तीच्या किमतीत वाढ करणारा ठरला आहे. यासर्वासोबत विजेच्या समस्या या मुर्तीकारासांठी मोठी डोकेदुखीच ठरत आहे. ग्रामीण भागात सध्या मुर्तीचे रंगकामाचे काम जोमात सुरु आहे. अशा परिस्थितीत वीजेच्या समस्या कामात मोठ्य अडथळे निर्माण होत असल्यामुळे कामे अति मंद गतीने होत आहेत. यामुळे मुर्तीकार पुर्णतः हवाजलदील होत आहे. गॅस बत्ती, इन्हर्टर अशी साधने सर्वसाधारण मुतीकारांना परवडणारी नाहीत. ही समस्या आज बऱ्याच मुर्तीकारांना भासत असल्याचे मत मुर्तीकार गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे. गोव्यात मुर्तीकारांना अशा समस्या नसतात. त्यात त्यांना मुर्तीकलेसाठी पेन्शन योजनाही सुरु आहे. यासर्वाचा विचार करुन निदान कोकणात तरी मुर्तीकारांना पेन्शन योजना सुरु केल्यास त्याचा मोठा फायदा होईल असे मतही काही मुर्तीकारांतून व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी मुर्तीकार संघटनेकडून दरनपत्रक दाखल केले होते त्याचा फायदा बऱ्याच मुर्तीकारांना झाला आहे. मात्र समस्याचा विचार करता मुर्ती वाढ करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे मुर्तीकारांचे म्हणणे आहे. १ फुट मुर्तीमागे १००० रुपये आकारण्यात येत होते. त्यात आता वाढ होवून १००० हजाराच्या मुर्ती जवळपास १२०० ते १५०० रुपयांना देण्यात येत आहे.

जिल्ह्यात मूर्तीमागे जीएसटी लागली नसली तरी रंगकामासाठी घेतलेले रंगांवर जीएसटी आकारली गेली आहे. मातीचे दरही वाढले आहेत. १५ ते २० टक्‍क्‍यांनी किमती यंदा वाढल्या आहेत. काही ठिकाणी शाडूच्या नावाखाली प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती देण्यात येत आहेत.
- नारायण सावंत, मूर्तिकार संघटना तालुकाध्यक्ष

Web Title: sawantwadi news ganesh festival GST