‘पीओपी’मुळे मातीकाम, मूर्तिकलाकारांची कसरत

भूषण आरोसकर
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - वजनाने हलक्‍या व दिसायला आकर्षक गणेश मुर्त्या अशी मानसिकता जिल्हावासियांची होत असल्यामुळे अलिकडेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचा शिरकाव होत आहे. यामुळे मातीच्या मुर्त्या बनविणाऱ्या मुर्तीकारांचा व्यवसायावर धोक्‍याची टांगती तलवार आहे. वाहतूक खर्च वाचत असल्यामुळे आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसकडे काही मुर्तीकाराही ओढले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मुर्तीकारांना गोवा सरकारच्या पार्श्‍वभूमीवर पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तसे केल्यास मुर्तीकारांना मोठा फायदा होईल.

सावंतवाडी - वजनाने हलक्‍या व दिसायला आकर्षक गणेश मुर्त्या अशी मानसिकता जिल्हावासियांची होत असल्यामुळे अलिकडेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचा शिरकाव होत आहे. यामुळे मातीच्या मुर्त्या बनविणाऱ्या मुर्तीकारांचा व्यवसायावर धोक्‍याची टांगती तलवार आहे. वाहतूक खर्च वाचत असल्यामुळे आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसकडे काही मुर्तीकाराही ओढले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मुर्तीकारांना गोवा सरकारच्या पार्श्‍वभूमीवर पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तसे केल्यास मुर्तीकारांना मोठा फायदा होईल.

गेल्या दोन वर्षात मातीच्या मुर्ती पेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्यांचा शिरकाव होत असलेला दिसून येत आहे. सोशल मिडियाद्वारे मुर्तीची निवड करुन एकत्रित मुर्त्या आणण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरीक सरसावला आहे. मोठ्या मुर्त्यांसाठी लागणारे मनुष्य बळ, श्रम, वाहतुक खर्च या गोष्टीचा विचार करुन प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मुर्ती ही मातीच्या मुर्तीपेक्षा आकर्षक असा समज होत असलेल्या नागरीक वर्ग वाढत आहे. शिवाय पेण, कोल्हापूरहून कमी खर्चात एकत्रितरित्या मुर्त्या आणत असल्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यामुळे व्यावसायास होत असलेला फायदा लक्षात घेता काही मुर्तीकारही मातीच्या मुर्तीपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या देण्याकडे वळत आहेत. पुर्वी जिल्ह्यातील मुर्तीकार पेणहून मुर्त्या आणून रंगवत असत; मात्र अलिकडे वॉट्‌सॲप सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून मुर्तीकार व नागरीक मुर्त्यांची निवड करतात. त्यांनंतर एकत्रित रित्या जावून मुर्त्या आणतात. यात सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहतूक खर्चही वाचतो. यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याही दुप्पट किंमतीने विकल्या जात असल्यामुळे जिल्ह्यातील काही मुर्तीकारामुळेच प्लॅस्टर ऑफ पॅरीसला प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे. एकत्रित आठ मूर्त्या पेणहून आणल्यास पुर्वी ज्याठिकाणी आठ हजार वाहतूक खर्च व्हायचा तेथे आता पाच ते साडेपाच हजार रूपये वाहतूक खर्च होतात. काही मुर्तीकार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या लाल मुर्त्याच्या मातीना तांबडी माती असे सांगून दिशाभूल करीत असल्याचेही चित्र आहे. जिल्ह्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठा शिरकाव होत असला तरी काही मूर्तीकार मातीच्या मुर्त्याना प्राधान्य देतात. तसेच यापुढेही देवू  असे ते सांगतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस वर बंदी आणण्यची मागणीही मुर्तीकारांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचा शिरकाव होत असल्यामुळे मातीच्या मुर्तीकारांचा व्यवसाय भविष्यात धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जिल्हावासियांचा गणेश चतुर्थी हा सण प्रमुख समजला जातो. या सणामुळे येथील मुर्तीकारांची कला जोपासली जाते. शिवाय त्यांना व्यवसाय म्हणून आर्थिक मदतही होते. अशात जिल्हा बाहेरुन आयात होत असलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे मातीच्या मुर्ती बनविणाऱ्याच्या व्यवसायावर धोक्‍याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. 

शासनाने प्रत्येक मूर्तीमागे किमान २०० रूपये दिल्यास याचा लाभ जिल्ह्यातील मूर्तीकारांना होवू शकतो. याबाबत पालकमंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा केला होता. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा शिरकाव ही चिंतेची बाब आहे.
- दीपक जोशी, खजिनदार, मूर्तिकार संघटना

Web Title: sawantwadi news ganeshotsav

टॅग्स