गोवा बांबूळी रुग्णालयात शुल्क आकारणीचा निर्णय मागे

अमोल टेंबकर
शनिवार, 6 जानेवारी 2018

सावंतवाडी: गोवा बांबूळी रुग्णालयात शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेण्याबाबत आम्ही सुध्दा प्रयत्नशिल आहोत, त्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करुन हा वाद कायमचा मिटवा असे आवाहन केले आहे. त्यामुळे तो निश्‍चीतच येणार्‍या काळात यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन गोवा राज्याचे बांधकाम मंत्री सुदन ढवळीकर यांनी आज (शनिवार) येथे दिले.

मायनिंगच्या माध्यमातून येणारे उत्पन्न कमी झाल्याने तसेच जीएसटीच्या घोळामुळे राज्य चालविण्यासाठी येणारा पैसा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांना पैसे आकारण्याचा निर्णय गोवा शासनाकडून घेण्यात आला होता, अशी कबूली सुध्दा त्यांनी यावेळी दिली.

सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमासाठी श्री. ढवळीकर आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहीती दिली. ते म्हणाले, गोवा आणी सिधुदूर्गचे अनेक वर्षापासुनचे नाते आहे तसेच गोवा मेडीकल कॉलेल उभारताना सिधुदूर्ग जिल्ह्याने सुध्दा पाठीबा दिला होता या सर्व गोष्टी लक्षात घेवून सदयस्थितीत गोवा बांबूळी रुग्णालयात आकारण्यात आलेल्या शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी यापुर्वी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा केली होती. आवश्यक असल्यास पुन्हा एकदा चर्चा करुन मात्र याबाबीवर कायम तोडगा काढण्याचा आमचा विचार आहे.

शुल्क लावण्याचा निर्णय आम्ही नाईलाजाने घेतला आहे हा सर्व घोळ जीएसटी मुळे झाला आहे. राज्य चालवण्यास जो पैसा लागतो तो येत नसल्याने हे पाउल उचलावे लागले विश्वजीत राणे हे आरोग्यमंत्री झाल्यानंतर शुल्क आकारण्याबाबत चर्चा होते असे काही नाही. सदयस्थिती लक्षात घेता मायनिंगच्या माध्यमातून मिळणारा महसुल कमी झाला आहे, त्यात जीएसटी मुळे नवीन घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच गोवा शासनाने शुल्क आकारणीचा निर्णय घेतला. मात्र, गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज मध्ये जे काही शुल्क आकारले जात आहे. त्याबाबत निश्‍चीत असा मार्ग काढण्यात येणार शुल्क आकारणीवर निर्माण झालेला वाद आम्हाला सुध्दा मिटवायचाच आहे.

महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आरोग्यदयी योजने तून गोवा सरकारला पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्याबाबत येथील पालकमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी त्याच्यावर दबाव आणावा पत्रकारांनी ही आपले एक निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना पाठवावे अशी सुचना ही त्यांनी यावेळी केली तसेच ब्राम्हण मंडळ ही आपले निवदेन पाठवेल असे ही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

सिधुदूर्ग गोव्याचे नाते कायम जपले जाईल
सिंधुदुर्ग व गोव्याचे जवळचे नाते आज गोवा मेडिकल कॉलेज उभारताना सिधुदूर्गातील लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्याना ही त्याचा फायदा झाला पाहिजे यावर अभ्यास करू पण तो पर्यत केस पेपर शुल्क वगळता शस्त्रक्रिया तसेच रुग्णसेवेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत. यांची खबरदारी निश्‍चीत घेऊ असेही त्यांनी सांगितले.

Web Title: sawantwadi news goa bambuli hospital charges issue