प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्या वाटप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सावंतवाडी  - येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे प्लास्टिकमुक्त सावंतवाडी या उपक्रमांतर्गत गुरुवारी येथे एक हजार कापडी पिशव्यांचे वितरण झाले. येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते ग्राहकांना मोफत कापडी पिशव्यांचे वितरण झाले. यात सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारीही सहभागी झाले होते. 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगून पालिकेने स्वच्छतेला नेहमीच अग्रस्थान दिले आहे. लवकरच पालिका, शहरवासीय आणि सेवाभावी संस्था व मंडळे यांच्या सहकार्यातून शहरात महास्वच्छता अभियान राबविणार असल्याचे सांगितले. पालिकेतर्फे स्वच्छ सावंतवाडी सुंदर सावंतवाडी हा उपक्रम सुरू आहे. याला शहरातून प्रतिसादही मिळत आहे. 

यावेळी माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, सीए लक्ष्मण नाईक, डॉ. मुग्धा ठाकरे, प्रशांत कवठणकर, डॉ. विशाल पाटील, भगवान रेडकर, ऍन्ड्रू फर्नांडीस, सुप्रिया केसरकर, अनघा शिरोडकर, सौ. स्मिता नाईक, संतोष नाईक, प्रसाद सापळे, डॉ. ललित विठलानी, नीलेश माणगावकर, आनंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

Web Title: sawantwadi news plastic