चाकरमान्यांचे स्वागत खड्ड्यांनीच 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - सर आली धावून अन्‌ माती गेली वाहून...असे म्हणण्याची वेळ सिंधुदुर्गवासीयांवर आली आहे. येथील निरवडे-सावंतवाडी मार्गावर असलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांतील माती वाहून गेल्यामुळे प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. रेल्वेस्टेशनजवळच ही स्थिती निर्माण झाली असल्याने चाकरमान्यांचे स्वागत खड्ड्यांनी होत आहे. 

सावंतवाडी - सर आली धावून अन्‌ माती गेली वाहून...असे म्हणण्याची वेळ सिंधुदुर्गवासीयांवर आली आहे. येथील निरवडे-सावंतवाडी मार्गावर असलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांतील माती वाहून गेल्यामुळे प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. रेल्वेस्टेशनजवळच ही स्थिती निर्माण झाली असल्याने चाकरमान्यांचे स्वागत खड्ड्यांनी होत आहे. 

दोन महिन्यांपूर्वीच निरवडे-सावंतवाडी दरम्यान असलेल्या खड्ड्यांवर रस्त्याचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वेस्टेशनपासून सावंतवाडी व गोव्याच्या ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहन हाकताना अक्षरशः कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. रेल्वेस्टेशनपासून अवघे काहीसे अंतरावर ही स्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काळात मोठा चाकरमानी वर्ग दाखल होतो. यात सावंतवाडीच्या दिशेने जाणारा चाकरमानी वर्ग, तसेच खरेदीसाठी जाणारा ग्राहक वर्ग मोठा असतो, हा विचार करून या रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते. निदान 2 ते 3 किलोमीटर तरी रस्ता होणे महत्त्वाचे होते. सद्यःस्थितीत प्रशासनाकडून चाकरमानी या भागात दाखल होणार या हेतूने या मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत माती टाकून खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कार्यवाही केली; मात्र दोनतीन दिवस झालेल्या दमदार पावसात पुन्हा "जैसे थे'ची स्थिती निर्माण झाली आहे. चतुर्थी सणालाच पावसातील पाण्यात माती वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करण्याची वेळ आली. चाकरमानी व वाहन चालकांनी रस्त्याच्या या अवस्थेबाबत प्रशासनावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रशासनाला जाग केव्हा ? 
निरवडे-सावंतवाडी दरम्यान असलेले रेल्वेस्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळाला आहे. शहराकडे व गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दुर्दैवी स्वरूपाची म्हणावी लागेल. अलीकडेच या मार्गावर पडलेले खड्डे पाहता प्रवास करणे कंटाळवाणे बनले आहे. रेल्वे टर्मिनसचा विचार करून या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्‍यक होते. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. 

Web Title: sawantwadi news pothole