आडाळीत आयुर्वेद संशोधन केंद्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सावंतवाडी - आडाळी (ता. दोडामार्ग) आयुर्वेदीक विद्यालय संशोधन केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी हिरवा कंदील दिला आहे. या आयुर्वेदीक विद्यालयात योगा केंद्र, नॅचरोपॅथी व आयुर्वेद संशोधन केंद्र असणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील आरोग्य पर्यटनाला होणार आहे, असा विश्‍वास भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला. त्यांनी याबाबत आज नाईक यांची भेट घेतली.

निसर्गाने भरभरून दिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५० हून अधिक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. या वनौषधींवर प्रक्रिया व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे, आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, सिंधुदुर्गातील आयुर्वेद पर्यटनाला, आरोग्य पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने केंद्रीय आयुषमंत्री नाईक यांच्याकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या धर्तीवर जिल्ह्यात आयुर्वेदिक विद्यालय, संशोधन केंद्र मंजूर करण्याची मागणी मी केली होती. ही मागणी नाईक यांनी तातडीने मान्य करून मंजुरीही दिली आहे. राज्य सरकारनेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पासाठी आडाळी येथील एमआयडीसीने संपादित केलेली जागा मिळावी, अशी मागणी मी केली होती. याला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

या आयुर्वेदिक विद्यालयात योगा केंद्र, नॅचरोपॅथी व आयुर्वेद संशोधन केंद्र असणार आहे. या प्रकल्पामुळे निश्‍चितपणे जिल्ह्याच्या आरोग्य पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Web Title: sawantwadi news Research Center