निवृत्त पोलिसाकडूनच दारूविक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - निवृत्त पोलिसाच्या पत्नीकडून माडखोलात दारू विक्री केली जात आहे. त्यात येथील पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी साथ देत आहे. त्यामुळे दोघांची चौकशी व्हावी, अन्यथा १५ ला पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने आज येथील पोलिसांना देण्यात आला आहे.

सावंतवाडी - निवृत्त पोलिसाच्या पत्नीकडून माडखोलात दारू विक्री केली जात आहे. त्यात येथील पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी साथ देत आहे. त्यामुळे दोघांची चौकशी व्हावी, अन्यथा १५ ला पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने आज येथील पोलिसांना देण्यात आला आहे.

याबाबत तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ संबंधित दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात येईल. पर्यायी माणूस मिळाल्यानंतर त्या पोलिस  कर्मचाऱ्याचे बिट बदलण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिले. माडखोल येथील संबंधित ग्रामस्थांची मागणी घेऊन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी आज येथील पोलिस निरीक्षकांना घेराव घातला. या वेळी गावातील महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या देऊळवाडी परिसरात राहत असलेला एक निवृत्त पोलिस आपल्या कुंटुबीयांना सोबत घेऊन राजरोसपणे दारू धंदा करीत आहे. आपण खात्यात आहे. त्यामुळे आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या धंद्याकडे असलेली स्ट्रीट लाईट केवळ आपल्या फायद्यासाठी तो बंद करून ठेवत आहे. त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. याबाबत त्या ठिकाणी बीट सांभाळणारे पोलिस हवालदार प्रवीण माने यांना कल्पना देण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे संबंधितांच्या विरोधात आज सर्व ग्रामस्थांनी येथील पोलिस ठाण्यात धडक दिली होती.

या वेळी सरपंच सुरेश आडेलकर, सुनंदा राउळ, अश्‍विनी लाड, संजन मोरजकर, चंद्रकला राऊळ, सुरेखा राऊळ, सुषमा नार्वेकर, शोभा राऊळ, अस्मिता राऊळ, अश्‍विनी राऊळ, विजया राऊळ, चंद्रकला राऊळ, सीताबाई राऊळ, भारती राऊळ यांच्या पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर, दाजी राऊळ, उमेश तेली आदी उपस्थित होती.

चुकीचे होत असेल, तर आपण कोणावर कारवाई करण्यास मागे हटणार नाही. तुम्ही तपास कामात मदत करा संबंधितांवर कारवाई नक्कीच करण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, तर निवृत्तांचे काय त्यांना सुध्दा सोडणार नाही.
- सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक

Web Title: sawantwadi news Retired police liquor

टॅग्स