तालुकास्तरीय कॅम्पमध्ये गाड्यांचे पासिंग करावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. यामुळे प्रत्येक तालुक्‍यात आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये गाड्या पासिंग कराव्यात, अशी मागणी आज जिल्ह्यातील ट्रक व रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे येथे खासदार विनायक राऊत यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान आपल्याला आरटीओ अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात आहे. यामुळे कायदा राबविताना शिथिलता आणावी अन्यथा आम्ही सुध्दा सहकार्य करणार नाही, असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. यामुळे प्रत्येक तालुक्‍यात आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये गाड्या पासिंग कराव्यात, अशी मागणी आज जिल्ह्यातील ट्रक व रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे येथे खासदार विनायक राऊत यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान आपल्याला आरटीओ अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात आहे. यामुळे कायदा राबविताना शिथिलता आणावी अन्यथा आम्ही सुध्दा सहकार्य करणार नाही, असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून तालुकास्तरावर कॅम्प घेण्यात येतात; मात्र लायसन्स देण्यापलीकडे अन्य कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी केल्या जात नाही. परिणामी गाड्या पासिंग करण्यासाठी संबधित वाहन चालकांना थेट ओरोस गाठावे लागते. त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे येथील वाहनधारकांची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक तालुक्‍यात आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पच्या वेळी पासिंग केले जावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच ट्रकवर चार ही बाजूने रेडीयम लावण्याची अट शिथील करावी. त्यासाठी संबंधित ट्रक चालकाला अडीच हजार रुपयापर्यंत आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो. अशा विविध मागण्या यावेळी खासदार श्री. राऊत यांच्याकडे मांडल्या.

या वेळी श्री. राऊत यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी आम्ही राबवित असलेला कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या सुचनेनुसार अंमलबजावणी केली जात आहे. यात कोणत्याही वाहनधारकांना त्रास देण्याचा हेतू नाही; परंतु नव्या आदेशानुसार ट्रायल घेण्यात येणारा ट्रॅक हा अडीचशे मीटरचा असणे गरजेचे आहे. तसेच त्या ठिकाणी सीसीटिव्ही आणि तो परिसर अन्य वाहनांसाठी बंधनकारक असणे आवश्‍यक आहे. आणि तसा परिसर ओरोस वगळता आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कायद्याच्या बाहेर आम्ही काहीही करू शकत नाही, असे आरटीओ अधिकारी मुरलीधर मगदुम, योगेश भोतारी, राकेश पाटील यांनी सांगितले. याबाबत आपण जिल्हा आरटीओ अधिकारी सुभाष पेडामकर यांच्याशी चर्चा करुन काही बाबतीत शिथिलता आणता येईल का यासाठी प्रयत्न करू असे श्री. राऊत यांनी आश्‍वासन दिले. यावेळी बावतीस फर्नाडीस, इसाक खेडेकर, भाई तळेकर, गुरूनाथ वालावलकर, बाळा मयेकर, महेश नाईक, सुधीर पराडकर, भाऊ पाटील, सुदेध धर्णे, राजू नाईक दशरथ शिंदे आदी चालक मालक उपस्थित होते.

बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश 
चालक मालकांच्या मागण्या लक्षात घेता जिल्हा आरटीओ अधिकारी पेडामकर आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील मंगळवारी आरोस येथील आरटीओ कार्यालयात बैठक आयोजित करा आणि त्या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना यावेळी श्री. राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही मोठे बदल असतील तर त्याबाबत आपण पाठपुरावा करू, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

Web Title: sawantwadi news rto