सावंतवाडी पंचायत समिती आवारात रात्री मद्यपींचा वावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

सांवतवाडी - येथील पंचायत समिती कार्यालयाच्या जागेत रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून इमारतीमधील पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आल्याने गेले आठ दिवस महीला प्रसाधनगृहात पाणी नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधुनही काहीच हालचाली होत नसल्याने महीला कर्मचाऱ्यांना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. 

सांवतवाडी - येथील पंचायत समिती कार्यालयाच्या जागेत रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून इमारतीमधील पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आल्याने गेले आठ दिवस महीला प्रसाधनगृहात पाणी नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधुनही काहीच हालचाली होत नसल्याने महीला कर्मचाऱ्यांना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. 

येथील पंचायत समितीची मुख्य इमारत शहरातील सालईवाडा परिसरात आहे; मात्र इमारत जीर्ण झाल्याने ती निर्लेखित करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीमधील अर्धे अधिक विभाग दुसरीकडे म्हणजेच शिरोडा नाका येथील जिल्हा परिषदेच्या गोडाऊनच्या जागेत हलविण्यात आले आहे; मात्र शिक्षण, पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे व महीला व बाल कल्याण असे चार विभाग आजही जीर्ण इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या इमारतीत कार्यरत आहेत. 

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय विभाग हा शिरोडानाका येथे गोडाऊनच्या जागेत हलविण्यात आल्यानंतर सालईवाडा येथील इमारतीत कार्यरत असलेल्या विभागाकडे जणू दुर्लक्षच झाल्याचे बोलले जात आहे. 

या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढला आहे. त्याचा त्रास याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गांना सहन करावा लागत आहे. इमारतीत महीला व पुरूष अशी दोन प्रसाधनगृहे आहेत. यासाठी इमारतीच्या आवारात असलेल्या विहिरीमधुन इमारतीच्यावर पाण्याच्या टाकी पर्यंत पाईप लाईनद्वारे पाणी नेण्यात आले आहे; मात्र मद्यपींकडून अलिकडेच कित्येक वेळा पाण्याची पाईपलाईन तोडण्यात येत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना प्रसाधन गृहात पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. आठ दिवसापुर्वी मद्यपींनी ही पाईपलाईन तोडल्याने तेथील महिलांना प्रसाधनगृहात पाण्याअभावी शेजाऱ्याकडे जावे लागत आहे. प्रशासनकडूनही वेळोवेळी पाईपलाईन दुरूस्ती करण्यात आली; मात्र यावर कायस्वरूपी पर्याय शोधला जात नसल्याने पुन्हा पुन्हा या समस्येला प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. महीलांची समस्या लक्षात घेता यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. 

कायमस्वरूपी तोडगा काढू 
पंचायत समितीच्या इमारत परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी पेट्रोलिंग करावे. यामुळे मद्यपींवर आळा बसेल. पंचायत समितीमधील महीला कर्मचाऱ्यांचा विचार करता याबाबत कायमचा तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी आर्थिक तरतुद करू, असे सभापती पंकज पेडणेकर यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi Panchayat Samiti Drinkers spot at Night