पद रेश्‍मा सावंताना, शह केसरकरांना 

अमोल टेंबकर
शुक्रवार, 24 मार्च 2017

सावंतवाडी - पालकमंत्री दीपक केसरकर यांना आव्हान देण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या तोडीचे मानले जाणारे जिल्हा परिषद अध्यक्ष पद देऊन कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी एक प्रकारे राजकीय शह दिला आहे. त्यामुळे याचा फायदा भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात आणि तत्पूर्वी झालेल्या पालिका निवडणुकात बऱ्यापैकी कॉंग्रेसने आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे आता अशाच प्रकारे केसरकर गाफिल राहिल्यास त्यांना पुढील निवडणुका जड जाण्याची शक्‍यता आहे. 

सावंतवाडी पालिकेचे नगराध्यक्ष ते आमदार आणि आता राज्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी आयुष्यातील महत्त्वाचे टर्निंग पॉईट यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचीच मदत केली होती. नगराध्यक्षपदी विराजमान होताना आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदार अशी त्यांची वाटचाल राहिली; मात्र आमदार म्हणून निवडून आल्यांनतर केसरकर आणि राणेंचे पटले नाही. केसरकर यांनी वारंवार दशहतवादाचा मुद्दा घेऊन राणेंना खिंडीत पकडले. 

या सर्व परिस्थिती राणे हे माझे राजकीय गुरू आहेत, अशी विधाने केसरकरांनी करत राणेंना थेट शिंगावरच घेतले. गुंडगिरी दहशतवादाबरोबर मी सुद्धा एक दिवस पालकमंत्री असेन असे सांगून राणेंना थेट आव्हानच देऊन टाकले. 

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांच्या रूपाने उमेदवार आणून त्या ठिकाणी माजी खासदार नीलेश राणे यांचा पराभव केला. व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या केलेल्या पराभवाचे श्रेयही त्यांनी घेतले. राणेंचा पराभव झाल्यानंतर दबदबा काहीसा कमी होऊ लागला. याला राणेही तितकेच जबाबदार राहिले; परंतु काही दिवसांनी पुन्हा राणेंनी जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासह पालिका निवडणुकीत केसरकरांच्या तालुक्‍यातच त्यांना राणेंनी मात दिली. एवढ्यावरच न थांबता जिल्हा परिषद अध्यक्षपद सावंतवाडीला देऊन केसरकरांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालेल्या रेश्‍मा सावंत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. 

जबाबदारी वाढली... 
सावंतवाडी तालुक्‍याला अध्यक्षपदाचा मान देण्यात आल्याने कॉंग्रेस तालुक्‍यात आणि शहरात कॉंग्रेस वाढविण्यासाठी तालुकाध्यक्ष संजू परब यांची जबाबदारी वाढली आहे. परब यांनी यापूर्वी पालिकेत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीत राणेंना यश मिळवून दिले आहे. त्यांच्या या यशाचा सन्मान करण्यासाठी हे पद दिले गेल्याचीही कॉंग्रेसमध्ये चर्चा आहे; मात्र परब यांना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

Web Title: sawantwadi politics