सावंतवाडीत दाम्पत्याला लुटले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सावंतवाडी - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु असताना पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा युवकांनी एका वृद्ध दाम्पत्याला लुबाडल्याचा प्रकार आज घडला. त्यांच्याकडुन मंगळसुत्र आणि लक्ष्मी हार असे सुमारे सत्तर हजार रुपयांचे दागिने घेवून त्यांनी पोबारा केला आहे. हा प्रकार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील खासकीलवाडा भागात जेलनजिक घडला. 

सावंतवाडी - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु असताना पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा युवकांनी एका वृद्ध दाम्पत्याला लुबाडल्याचा प्रकार आज घडला. त्यांच्याकडुन मंगळसुत्र आणि लक्ष्मी हार असे सुमारे सत्तर हजार रुपयांचे दागिने घेवून त्यांनी पोबारा केला आहे. हा प्रकार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील खासकीलवाडा भागात जेलनजिक घडला. 

दोघे संशयित दुचाकीने आले होते. त्यांनी आपल्याला काल रात्री शहरात मोठी चोरी झाली. तुमचे दागिने चोरण्याची भिती नाकारता येत नाही असे सांगून दागिने कागदाच्या पुडीत बांधून देतो असे सांगितले. पुडीही बांधून दिली; मात्र त्यात माती आणि दगड होते असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी ः यातील फसवणूक झालेल्या सौ. सावित्री गावडे या आपल्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे येथील ज्युस्तीननगर येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे आल्या होत्या. काल लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज सकाळी मिलेट्री कॅन्टीनमध्ये खरेदी करुन पुन्हा चौकुळ येथे परत जायचे असा त्यांचा कार्यक्रम होता. मात्र कॅन्टीनमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्या आपले पती गंगाराम यांच्यासह तेथे जायला बाहेर पडल्या. खासकीलवाडा भागातून जेलकडे येत असताना त्या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात युवकांनी "आजी आम्ही पोलिस अधिकारी आहोत, काल रात्री सावंतवाडीत मोठी चोरी झाली आहे. त्यामुळे तुमचे दागिने असेच घेवून फिरू नका. चोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही' असे सांगुन त्यांनी सौ. गावडे यांच्याकडे असलेले दागिने आपल्याकडे काढुन घेतले आणि आपण कागदाच्या पुडीत बांधून देतो असे सांगुन एक कागदाची पुडी त्यांच्याकडे दिली. दरम्यान काही वेळाने पुढे जावून गावडे दाम्पत्याने त्यांनी दिलेली पुडी उघडून पाहिली असता त्यात माती आणि दगड असल्याचे त्यांना दिसले. 

याबाबत त्यांनी आपल्या मुलाला याची कल्पना दिली. तिघांनी मिळून पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सौ. गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या अज्ञात चोरट्यांची रेखाचित्र तयार करण्यात आली. त्या अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे ठाणे अंमलदार अनिलकुमार पवार यांनी सांगितले. 

या घटनेचा पंचनामा हवालदार मंगेश शिंगाडे आणि विक्रम गवस यांनी केला. अधिक तपास प्रमोद काळसेकर करीत आहेत. 

चोरटे माहीतगार असण्याची शक्‍यता 
घडलेली घटना लक्षात घेता मंगळसुत्र लांबविणारे चोरटे माहितगार असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. सौ. गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काळ्या रंगाची दुचाकी होती. ते मराठी बोलत होते असे त्यांनी जबाबात म्हटले आहे. त्यानुसार पोलिस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title: Sawantwadi robbed couple

टॅग्स