सावंतवाडी : माडखोलमध्ये गाळ उपसा अखेर सुरू

जिल्हा प्रशासनाला जाग; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
 गाळ उपसा
गाळ उपसाsakal

सावंतवाडी : माडखोल-धवडकी येथील तेरेखोल नदीपात्रातील गाळ काढण्यास अखेरीस जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सुरुवात केली. ग्रामस्थांनी केलेली उपोषणे, शासनाकडे केलेला पाठपुरावा यामुळे उशिराने का होईना, शासनाने अखेर हा गाळ काढण्यास सुरुवात केली.

माडखोल-धवडकी येथून वाहणाऱ्या तेरेखोल नदीला येणारा पूर लक्षात घेता, शासनाने या नदीत साचलेला गाळ काढण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला होता; मात्र जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया राबवूनही तो काढण्यात आला नव्हता. याबाबत माजी सरपंच संजय लाड यांच्यासह काहींनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. १ मे रोजी याबाबत तहसील कार्यालयासमोर उपोषणही छेडले होते. यावेळी प्रशासनाने आश्वासनांपलीकडे काहीच केले नव्हते. अलीकडेच तेथील नागरिकांना स्थंलातरित व्हा, अशा नोटिसा बजावत एकप्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला होता.

याबाबत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. शिवाय उपोषणाचा इशाराही दिला होता. अखेर ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी गाळ उपसा करण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी विशेष प्रयत्न केले. या मोहिमेचा प्रारंभ विद्यमान उपसरपंच शिवाजी परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच संजय लाड, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळमेकर, बळीराम देसाई, तुळशीदास मुरकर, श्यामसुंदर कासकर, विजय राऊत, सागर येडये, शंभा धडाम, प्रशांत सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच संजय लाड, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष जॅकी डिसोजा, शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष राऊळ, लखन आडेलकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com