मोडक्‍या खेळण्यांचा चिमुकल्यांना घोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - लाखो रुपये खर्च करून येथील पालिकेने उभारलेली शहरातील उद्यानामधील खेळणी सद्यःस्थितीत मोडक्‍या अवस्थेत आहेत. यामुळे त्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या मुलांना नाराज होऊन परत फिरावे लागत आहे. 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर या बंद प्रकल्पाला मुद्दा उपस्थित करून रान उठविणारे काँग्रेसचे नगरसेवक याबाबत चिडीचूप दिसत आहे. यामुळे धोका टाळण्यासाठी किमान उन्हाळ्याच्या सुटीपूर्वी तरी खेळण्याची स्थिती सुधारा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सावंतवाडी - लाखो रुपये खर्च करून येथील पालिकेने उभारलेली शहरातील उद्यानामधील खेळणी सद्यःस्थितीत मोडक्‍या अवस्थेत आहेत. यामुळे त्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या मुलांना नाराज होऊन परत फिरावे लागत आहे. 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर या बंद प्रकल्पाला मुद्दा उपस्थित करून रान उठविणारे काँग्रेसचे नगरसेवक याबाबत चिडीचूप दिसत आहे. यामुळे धोका टाळण्यासाठी किमान उन्हाळ्याच्या सुटीपूर्वी तरी खेळण्याची स्थिती सुधारा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

येथील पालिकेतर्फे मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविली आहेत. बाजूला उभारलेले गेम पार्लरसाठी लाखो रुपये खर्च केले होते; मात्र ते सद्यःस्थितीत बंदावस्थेत आहे. त्यातील खेळणी गंजून गेली आहेत, तर बाहेर मैदानावर असलेली काही खेळणी वगळता बरीचशी खेळणी मोडक्‍या अवस्थेत आहेत. तसेच खेळण्याकडे जाणारे पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्या खेळण्यावर खेळणाऱ्या मुलांना अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती काही ज्येष्ठ नागरिकांनी दिल्यांनतर पाहणी केली असता खेळण्याची परिस्थिती वेगळीच दिसली. त्या ठिकाणी लावण्यात आलेले झोपाळे मोडलेल्या अवस्थेत आहे. काही नव्या घसरगुंड्या वगळता जुन्या घसरगुंड्या तुटल्या आहेत. त्याचा पार्श्‍वभाग फायबरचा असल्यामुळे मुलांना धोका उत्पन्न होऊ शकतो अशी शक्‍यता आहे. त्याचबरोबर सीसॉसुद्धा मोडक्‍या अवस्थेत आहे, मुलांना धरण्यासाठी आवश्‍यक असलेले हॅण्डलच नाहीत, अन्य बरीचशी खेळणी मोडक्‍या अवस्थेत आहेत, काही खेळण्याचे पार्ट गायब  झाले आहेत. अशा परिस्थिती दिवसाकाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या मुलांकडून मोडक्‍या खेळण्यांचा वापर केला जातो. त्यामुळे लहान मुले खेळण्याच्या नादात त्यांना अपघात होण्याची शक्‍यता नाकारण्यात येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो विचार पालिका प्रशासनाकडून करण्यात यावा आणि योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती; मात्र त्यांच्याकडून योग्य ते प्रयत्न होताना दिसत नाही. 

मोडकी खेळणी बदलण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. तसेच मुलांना धोका निर्माण होऊि शकतो, अशी खेळणी तूर्तास काढण्यात येणार आहे. किंवा त्याचा पर्यायी विचार करण्यात येणार आहे. या प्रकियेला काही दिवस लागणार आहेत.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष

आम्ही विरोधक म्हणून पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. धोकादायक खेळणी बदलण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने त्यात केली आहे. तसेच बंद असलेले गेम सेंटरसुद्धा सुरू करण्यात यावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि योग्य तो पाठपुरावा सुरू आहे मुलांना आणि उद्यानात येणाऱ्या नागरिकांना चांगली सेवा मिळावी हे आमचे प्रयत्न आहेत.
- परिमल नाईक, नगरसेवक, काँग्रेस

Web Title: sawantwaid garden issue