कौतुकास्पद! गावकऱ्यांनी केली श्रमदानाने शाळा दुरुस्त

श्रमदानाने पावसाळ्यापूर्वी इमारत केली सुरक्षित; वादळग्रस्त शाळेची दुरुस्ती
कौतुकास्पद! गावकऱ्यांनी केली श्रमदानाने शाळा दुरुस्त

मंडणगड : निसर्ग चक्री वादळात (nisarg cyclone) उध्वस्त झालेली शाळेच्या इमारतीला (mandangad school building) दुरुस्तीसाठी शासकीय निधी मिळाला नाही. प्रस्ताव प्रलंबित, त्यातच पावसाळा तोंडावर आलेला. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, त्याचबरोबर शाळेची इमारत पुर्णतः कोसळू नये यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थ व मुंबईकरांच्या विधायक विचारातून कुडुक बुद्रुक बोरीचा कोंड या शाळेची इमारत लॉक डाऊनच्या (lockdown) काळातही आर्थिक शैक्षणिक उठाव करीत श्रमदानातून दुरुस्त झाली. शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारा शैक्षणिक आदर्श शिक्षण क्षेत्रात कौतुकास्पद ठरला आहे.

गतवर्षी तालुक्यात जूनला झालेल्या निसर्ग चक्री वादळात शाळेच्या इमारतीचे संपुर्ण छप्पर उडाले. त्यात शाळेचे तब्बल साडेपाच लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून किरकोळ दुरुस्ती असणाऱ्या काही शाळांना निधी देण्यात आला. त्यामुळे पुर्णतः नुकसान ग्रस्त शाळा अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच राहिल्या आहेत. आदर्श पुरस्कार प्राप्त आपली शाळा अशा भयाण अवस्थेतच पडून असल्याचे पाहून ग्रामस्थांनी याकामी शिक्षकांच्या मदतीने पुढाकार घेतला. मुख्याध्यापक अरविंद नांदगावकर यांनी यासंदर्भात ग्रामस्थांची वैचारिक बैठक घेतली. यामध्ये पावसाळ्या पूर्वी इमारत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व महिलांनी गावातील शाळा उभी करण्याचा निर्धार केला. त्यासाठी नवतरुण विकास मुंबई मंडळाचे महत्वपूर्ण सहकार्य मिळाले.

कौतुकास्पद! गावकऱ्यांनी केली श्रमदानाने शाळा दुरुस्त
30 भूखंडधारकांना MIDC चा अल्टीमेटम; खुलासा न केल्यास भूखंड घेणार ताब्यात

दुरुस्तीला लागणारी साडेतीन हजार कौले, नवीन रिपा, वासे, खिळे, चुका यासाठी आर्थिक सहाय्य उभे केले. तसेच आठ दिवस दररोज १०० ग्रामस्थ व महिलांनी श्रमदान केले. असा एकूण २ लाख ५० हजारांचा उठाव करत शाळेची इमारत तात्पुरती दुरुस्ती पावसापूर्वी सुरक्षित केली. लॉक डाऊनमुळे अनेकांना फटका बसला आहे. रोजगार, काम बंद आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्थ, महिला व मुंबईकर यांनी गावाचा वार्षिक कार्यक्रम रद्द करून त्यासाठी होणारा खर्च शाळेसाठी खर्च करून केलेल्या विधायक कामामुळे आदर्श निर्माण केला आहे.

"ग्रामस्थांच्या श्रमदानातुन शाळा पूर्वीप्रमाणे तात्पुरती छप्पर दुरुस्ती करुन सुसज्ज करण्यात आली. याकरीता नवतरुण विकास मंडळ मुंबई, कुडुक बु॥बोरीचा कोंड ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांचे योगदान लाभले. मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत."

- अरविंद नांदगावकर, मुख्याध्यापक.

"गावाच्या प्रवेशद्वारावर असणारी शाळा गावाची शान आहे. तिची दुरवस्था तशीच राहिल्याने ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मंडळांनी याकामी पुढाकार घेतला. लागणारे साहित्य मदतीच्या रूपाने देत सर्व गावकरी स्वयंस्फूर्तीने श्रमदानाला उतरले. शैक्षणिक मदतीचे शेकडों हात एकत्र आल्याने हे शक्य झाले."

- वसंत अबगुल, अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ.

कौतुकास्पद! गावकऱ्यांनी केली श्रमदानाने शाळा दुरुस्त
पुणे महानगरपालिकेला थेट लस खरेदीसाठी राज्याच्या परवानगीची गरज नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com