School Girl : शाळकरी मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

अल्पवयीन बालिकेविरोधात गुन्हा करणाऱ्या नराधमांना कठोर संदेश देणारा हा निर्णय आहे.
Khed Police School Girl Crime News
Khed Police School Girl Crime Newsesakal
Summary

खेड न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर पहिल्यांदाच बलात्कारासह खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाचे मृत मुलीच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आहे.

खेड (रत्नागिरी) : तालुक्यातील एका शाळकरी मुलीवर (School Girl) बलात्कार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (Khed Sessions Court) न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बुधवारी (ता. ३) हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सूर्यकांत नवनाथ चव्हाण असे फाशी ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी या खटल्यात जोरदार युक्तिवाद केला.

या विषयीच्या अधिक माहितीनुसार, खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ ला शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरदेखील ती सापडली नाही म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात (Khed Police Station) तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै २०१८ ला अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एकाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी संशयित सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले.

Khed Police School Girl Crime News
Shashikant Shinde : 'त्यांना' नाकारलं, 'तो' रिपोर्ट अजित पवारांना देणार; आमदार शिंदेंचा थेट इशारा

पोलिसांच्या चौकशीअंती सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मृतदेह कुठे लपवला आहे, याची माहिती दिली. खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६(आय), ३६३, ३६४, २०१ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Khed Police School Girl Crime News
Political News : अजित पवार मुख्यमंत्री होणार? शिंदे सरकारला कोणताही धोका..; काय म्हणाले क्षीरसागर?

२८ एप्रिल २०२३ ला यातील संशयित आरोपी सूर्यकांत चव्हाण याला न्यायालयाने दोषी ठरवले होते. बुधवारी त्यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले. हा खटला सरकार पक्षातर्फे आव्हानात्मक होता; मात्र या खटल्यात २८ साक्षीदार सरकार पक्षाने तपासले.

सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद या खटल्यात महत्त्वाचा ठरला आहे. या खटल्यात तत्कालिन पोलिस निरीक्षक गंभीर, पोलिस निरीक्षक अनिल लाड, एपीआय गदडे, पीएसआय सोनावळे, पैरवी अधिकारी सूरज माने, राम नागुलवार यांनी तपासकामात मदत केली. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Khed Police School Girl Crime News
Bazar Samiti Election : 'शेतकऱ्यांसाठी विरोधात लढलो, पण 'या' चार आमदारांमुळं माझा पराभव झाला'

दृष्टिक्षेपात

  • आजोबा बोलवतात सांगून बालिकेला फसवले

  • घरातच बलात्कार करून गळा दाबून खून

  • मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत

  • साळसूदपणे मुलीच्या शोधासाठी सर्वांसोबत

  • अखेर गावकऱ्यांनीच फोडले आरोपीचे बिंग

Khed Police School Girl Crime News
Karnataka Election : 'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा

वकिली जीवन सार्थ झाले

अल्पवयीन बालिकेविरोधात गुन्हा करणाऱ्या नराधमांना कठोर संदेश देणारा हा निर्णय आहे. जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे ४५ वर्षांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेड न्यायालयात अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. मृत बालिकेला न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.

Khed Police School Girl Crime News
Sanjay Raut : 'फडणवीसांनी भगव्याचा पराभव करण्यासाठी सभा घेतली, तर जनता कधीच माफ करणार नाही'

आमच्या मुलीला न्याय मिळाला

खेड न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर पहिल्यांदाच बलात्कारासह खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाचे मृत मुलीच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आहे. आमच्या मुलीला आज न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com