शाळांना मिळणार शाळासिद्धी नामांकन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

राजापूर - विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होताना भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या शाळांना विविध प्रकारची नामांकने दिली जातात. या सर्व नामांकनांचा विचार आणि अभ्यास करून शासनाने ‘शाळासिद्धी’ हे आपले स्वतंत्र नामांकन निश्‍चित केले आहे. या उपक्रमाची या वर्षीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना ‘शाळासिद्धी’ हे नामांकन दिले जाणार आहे. त्याची वैधता पाच वर्षांची असेल.

शासनाच्या नामांकनाला पात्र ठरण्यासाठी संबंधित शाळांनी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करावयाची असून त्याचा प्रारंभ झाला असून २८ पर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत राहणार आहे. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा ठरविणारी विविध प्रकारची नामांकने दिली जातात. त्यामध्ये आयएसओसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि उच्च प्रतीच्या नामांकनाचाही समावेश आहे. त्या-त्या नामांकनावरून त्या-त्या शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा ओळखला जातो. ही नामांकने ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे प्रत्येक नामांकनाचा दर्जा आणि त्याचे महत्त्व विविधांगांनी अधोरेखित केले जाते. 

अशा सर्व नामांकनांचा अभ्यास आणि विचार करून शासनाने आता स्वतःचे शाळासिद्धी हे नामांकन तयार केले आहे. त्यासाठी नावनोंदणी करताना शाळांबाबत काही माहितीही भरावयाची आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी अशोक सोळंकी यांनी दिली.

असे ठरणार ‘शाळासिद्धी’ मानांकन
शाळांना देण्यासाठी शासनातर्फे निश्‍चित करण्यात आलेले शाळासिद्धी नामांकन देण्यासाठी ९९९ गुणांची स्वयंमूल्यांकन आधारित चाचणी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ४६ प्रकारची गाभा मानके आणि सात वेगवेगळी क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. या स्वयंमूल्यांकनावर आधारित चाचणीमध्ये ज्या शाळांना ९०० हून अधिक गुण मिळणार आहेत. त्या शाळांची त्रयस्त यंत्रणेमार्फत फेरतपासणी होऊन त्यांना ‘शाळासिद्धी’ मानांकन देण्यात येणार आहे.

Web Title: Schools will enroll

टॅग्स