समुद्रकिनारा होणार हायफाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

रायगड, पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वायफाय, एटीएम, सौरदिवे, सुसज्ज स्वच्छतागृह आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे...
अलिबाग - महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाद्वारे समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने गावांचा विकास केला जाणार आहे.

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची यासाठी निवड झाली आहे. या ग्रामपंचायतींना किनारा व्यवस्थापन व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २० लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून ‘निर्मल सागरतट’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सागरतट व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे. निवड झालेल्या ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या निधीचे तीन टप्प्यात वाटप केले जाणार आहे. निधीतून किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे, कचराकुंड्या बसवणे, बायोगॅस, सौर दिवे, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी वाहनतळ, निवारा शेड, रेस्टिंग खुर्च्या, एटीएम व्यवस्था, वायफाय सुविधा, स्वच्छतागृह, स्नानगृह यासारख्या सुविधा विकसित कराव्या लागणार आहेत.

अलिबाग तालुक्‍यातील नागाव, रेवदंडा, आक्षी, मिळकतखार, किहिम व आवास या सहा ग्रामपंचायतींचा; तर मुरूड तालुक्‍यातील काशिद, श्रीवर्धन तालुक्‍यातील दिवेआगर, हरिहरेश्वर व उरण तालुक्‍यातील पिरवाडी, नागाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामधील काही ग्रामपंचायतींना निधीचे वाटप झाले आहे.

निर्मल सागरतट अभियानामुळे गावातील पर्यटनाला चालना मिळेल, पर्यावरणाचे संवर्धन होईल व गावात रोजगारनिर्मिती होईल. गावाच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढावा हादेखील या योजनेमागचा मूळ उद्देश असणार आहे. मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या अभियानांतर्गत केलेल्या कामांचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे.
- कॅप्टन सूरज नाईक, प्रादेशिक बंदर विकास अधिकारी, मेरिटाईम बोर्ड.

Web Title: sea beach hi-fi