उधाणाने किनाऱ्याची वाताहत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

रत्नागिरी - पाऊस, वेगवान वारा आणि उधाण यामुळे सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मिऱ्याला बसला असून मजबूत बंधाऱ्याचे दगड ठिकठिकाणी वाहून गेले आहेत. पंधरामाड परिसरात समुद्राचे अतिक्रमण झाल्याने लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत.

पावसाचा जोर कमी झाला तरीही उधाण वाढत आहे. दुपारी अजस्त्र लाटांनी मिऱ्या येथील अलावा, भाटकरवाडा, पंधरामाड येथे धूप झाली आहे. नवीन बंधाऱ्याची वाताहत झाली आहे. पाटीलवाडीतील घरांवर लाटांचे पाणी येत होते. ग्रामस्थही जीव मुठीत ठेवून राहत आहेत. बंधाऱ्याला पडलेले भगदाड वाढतच आहे. मिरकरवाडा येथील नवीन संरक्षक भिंतींमुळे हा प्रकार घडत असल्याचे मिऱ्यावासीयांचे म्हणणे आहे. भाट्येतील सुरूची झाडे कोसळत असून समुद्राने अतिक्रमण केले आहे. मनोऱ्याखालील वाळू वाहून गेल्याने तो धोकादायक बनला आहे. किनाऱ्यावरील विजेचे खांब उखडले असून मोठे नुकसान झाले आहे. मांडवी जेटी लाटांच्या तडाख्यात सापडली असून जोंधळ्या मारुतीचे मंदिर भरतीवेळी पूर्ण पाण्याखाली होते. दरम्यान, आज दिवसभर विश्रांती घेत पाऊस पडत आहे; मात्र सकाळपासून वेगवान वारे वाहत आहेत. पावसामुळे चिपळूणात उर्मिला घांगडेंच्या घराचे ४४ हजार २०० रुपये, रत्नागिरी खालची आळीत गजानन मुळेंच्या घराचे नुकसान झाले. गणपतीपुळेत मंदिराची संरक्षक भिंत तुटली असून मांडवीत समुद्राच्या भरतीचे पाणी किनाऱ्यावर आल्याने लोकवस्तीला धोका पोचला नाही.

पावसाचा जोर ओसरला
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजता जिल्ह्यात सरासरी ४९.८९ मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगड ११०, दापोली २५, खेड ५५, गुहागर ५, चिपळूण ५१, संगमेश्वर ५२, रत्नागिरी १०, लांजा ४६, राजापूर ९५ मिमी पाऊस झाला.

Web Title: Sea coastline Damage