सागरी सुरक्षा कवच मोहीम यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मालवण - सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जाणारी सागरी कवच मोहीम ३६ तासांनंतर आज सायंकाळी संपली. रेड टीम जिल्ह्याच्या सागरी हद्दीत तसेच मुख्य मार्गावरून जिल्ह्यात घुसू नये, यासाठी सागरी गस्तीसह, नाकाबंदी, संवेदनशील ठिकाणांवर नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी पहारा देत ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

जिल्ह्यात सागरी कवच मोहिमेस बुधवार (ता.४) सकाळी सहा वाजता सुरवात झाली. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टी भागात तसेच संवेदनशील ठिकाणांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. कालच्या पहिल्या दिवशी अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सागरी गस्तीत सहभागी होत समुद्रातील नौकांची तपासणी केली. यात पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासह सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. समुद्रातील बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होता. यासाठी खास टेहेळणी मनोरेही उभारण्यात आले होते. 

आजच्या दुसऱ्या दिवशीही रेड टीमला जिल्ह्यात घुसण्यास अपयश आले. या टीमला रत्नागिरी जिल्ह्यात पकडण्यात आले. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत, रस्ते मार्गावर पोलिस कर्मचाऱ्यांनी कडक तपासणी मोहिम राबविली. त्यानंतर आज सायंकाळी सहा वाजता या मोहिमेची सांगता झाली.

Web Title: sea security campaign success