esakal | काळबादेवीत तरुणांकडून समुद्री कासवाला जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Ratnagiri : काळबादेवीत तरुणांकडून समुद्री कासवाला जीवदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काळबादेवी : तालुक्यातील काळबादेवी येथील मच्छीमारी नौकेच्या जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला नौकेवरील तरुणांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. काळबादेवी येथील संदेश मयेकर यांची मासेमारी नौका आहे. संदेश मयेकर त्यांचे सहकारी रुपेश मयेकर गणेश मयेकर यांच्यासोबत मासेमारी करिता समुद्रात गेले होते. मासेमारी 'डोल पाण्यात सोडल्यानंतर या डोलीत मासळीसह एक मोठे समुद्री कासव देखील सापडले. या कासवाला बोटीवर घेतल्यानंतर बोटीवरील तरुणांनी या कासवाची मासेमारी जाळ्यातून सुटका केली. या नंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. या घटनेचा पूर्ण व्हिडीओ या तरुणांनी चित्रित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच तरुणांच्या कामगिरीचे कौतूक करण्यात येत आहे.

loading image
go to top