पाजपंढरीला उधाणाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

हर्णै - पाजपंढरीला उधाणाने काल दुपारनंतर जोरदार दणका दिला. या गावासह हर्णै बंदरात लाटांचे तांडव सुरू आहे. रविवारी (ता. १५) रात्रीपासून काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे भीतीने येथील लोक झोपले नाहीत.

गेल्या दोन दिवसापासून समुद्राला आलेल्या उधाणामुळे हर्णै-पाजपंढरी परिसरातील किनारपट्टीलगत राहणाऱ्या मच्छीमारांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. उधाणाचे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे मच्छीमार बांधव धास्तावले आहेत. कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोचलेली नाही. 

रविवारपासून किनारपट्टीवर जोरदार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे दाणादाण उडाली. हर्णै, पाजपंढरीच्या किनारपट्टीलगतचे मच्छीमार घाबरले आहेत. जोरदार लाटांचे तडाखे किनारपट्टीला बसत आहेत. हर्णैमध्ये कनकदुर्ग व हर्णै जेटीवर जाणाऱ्या रस्त्यावर लाटा आदळत होत्या. बंदरामध्येही पाणी वाढले होते. पाजपंढरीकडे जाताना मोठमोठ्या लाटा रस्त्यावर येत असल्यामुळे बहुतांश ठिकाणी कचरा साचून रस्ता खराब झाला.

किनारपट्टीलगत राममंदिर व गजानन महाराज मंदिरापासून संपूर्ण वस्तीमध्ये पाणी घुसले होते. मोठ्या लाटा धडकून पाणी घरामध्ये शिरत होते. भगवान कुलाबकर यांच्या घराचे दोन्ही दरवाजे फोडून रविवारी दुपारी लाटांचे पाणी आत शिरले, तेव्हा ते जेवायला बसले होते. यामुळे कुलाबकरांच्या घरात रात्रभर कोणी झोपले नव्हते. विठा दोरकुळकर, पोशिराम दोरकुळकर, कमल दोरकुळकर, श्री. खोपटकर, मधुकर चोगले यांच्या व तेथून पुढे असणाऱ्या सर्व घरांमध्ये लाटांचे पाणी घरामध्ये घुसले. घरातील लहान मुलांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न या ग्रामस्थांना पडला. लाटांचे पाणी घरात घुसत असल्यामुळे अन्नही शिजवता येत नव्हते. त्यामुळे काही घरातील लोक उपाशीच होते.

दृष्टिक्षेपात
 जेटीवर जाणाऱ्या रस्त्यांवर लाटा
 कचरा साचून रस्ता खराब
 घराचे दरवाजे फोडून पाणी घुसले
 अन्नही शिजवणेही झाले मुश्‍कील

Web Title: sea wave in Harne Port