मतदान यंत्रे सावंतवाडीत सील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी - पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे आज येथे निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांच्या उपस्थितीत सील केली. तत्पूर्वी या यंत्रांची तपासणी करण्यात आली. काही राजकीय पक्षांनी या प्रक्रियेला आक्षेपही घेतला, मात्र त्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचा दावा प्रशासनाने केला.

येथील पालिकेच्या जिमखाना मैदानावरील बॅडमिंटन सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम आणि मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांच्या उपस्थितीत पार पडली.

या वेळी सर्व पक्षांचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उमेदवारांकडून यंत्रांची तपासणी करण्यात आली. मतदान अचूक होत आहे, की नाही याबाबत खात्री करण्यात आली. त्यानंतर ही यंत्रे सील करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही प्रक्रिया करताना काही यंत्रे सुरू झाली नाहीत, तर मतदान योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला निवडणूक विभागाने वेळ देणे गरजेचे होते; मात्र उलट अधिकाऱ्यांकडून संयुक्तिक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे याबाबत आम्ही लेखी तक्रार करणार आहोत, असे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदीप कुडतरकर यांनी सांगितले. प्रभाग एकमधील मशीन सुरूच होत नव्हते. त्यामुळे याबाबत आपण ही तक्रार करणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष गुरू गवंडे यांनी सांगितले.

एकंदरीत प्रांताधिकारी श्री. इनामदार यांच्याशी चर्चा केली असता सर्व उमेदवारांच्या समोर ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक यंत्रावर मते घालून तपासणी केल्यास दोन दिवससुध्दा वेळ पुरणार नाही; मात्र त्यांची शंका दूर करण्यात आली आहे. 

पाचव्या प्रभागात तीन यंत्रे 
या वेळी श्री. इनामदार म्हणाले, ‘‘प्रत्येक प्रभागासाठी दोन मतदान यंत्रे आहेत. यात एकावर नगराध्यक्ष उमेदवार तर दुसऱ्या यंत्रावर प्रभागातील अ आणि ब वॉर्डातील उमेदवारांचा समावेश आहे; मात्र पाच नंबर वॉर्डमध्ये उमेदवारांची संख्या तेरापेक्षा जास्त असल्यामुळे येथे तीन मशीन आहेत.

Web Title: Seal voting machines Sawantwadi