Seascape members leave for Kerala to help wildlife
Seascape members leave for Kerala to help wildlife

वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी आऊल्स व सीस्केप सदस्य केरळला रवाना

महाड : देवभूमी केरळ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती नंतर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरीही पुरासोबत वाहून आलेले साप आणि इतर वन्यप्राणी घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव या दोघांचाही जीव धोक्यात आला आहे. या वन्यजीवांना त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि वनविभाग यांची कुमक कमी पडत असल्याने त्यांच्या मदतीसाठी महाडमधून आऊल्स व सीस्केप या संस्थेचे सात सदस्य केरळला रवाना झाले आहेत.

नागरी वस्तीत अडकलेल्या वन्यजीवाना केरळमधील ईडूक्की धरण परिसरात सुरक्षित सोडण्याचे काम करणार आहेत. आऊल्सचे अध्यक्ष गणेश मेहेंदळे आणि सीस्केप या संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांच्याकडून मार्गदर्शन व सूचना घेऊन योगेश गुरव, चिंतन वैष्णव, कुणाल साळुंखे, प्रणव कुलकर्णी, चिराग मेथा, नितीन कदम आणि ओंकार वारणकर हे तरुण काल दुपारच्या नेत्रावती एक्सप्रेसने कोचीकडे रवाना झाले. 

पूर ओसरल्यानंतर येथील नागरिकांना वन्यप्राण्याच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे.स्थानिक यंत्रणातेथे काम करत असलेया तरी त्यांना मर्यादा असल्याने केरळ मधील जाँन लुईस यांने या दोन संस्थांची मदत मागीतली.निघालेल्या सर्व सदस्यांना डाँ.विकास नगरकर यांनी लसिकरण केले तर अभय कामत यांनी औषधे दिली.तर अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत यांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. यावेळी गणेश मेहेंदळे, प्रेमसागर मेस्त्री, सह्याद्री संस्थेचे डॉ. राहूल वारंगे उपस्थित होते. सीस्केपच्या टिमने आंबेनळी घाटातही मदतकार्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com