कोकण कृषी विद्यापीठात 30 ला बीज महोत्सव

कोकण कृषी विद्यापीठात 30 ला बीज महोत्सव

दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने 30 एप्रिलला विद्यापीठाच्या सर विश्‍वैश्‍वरैय्या सभागृहामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत बीज महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती असल्याने त्याचे औचित्य साधून या बीज महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये बीजाचे महत्त्व व संवर्धन या विषयावर तसेच आंबा पुनरुज्जीवन तंत्रज्ञान या दोन महत्त्वपूर्ण विषयावर शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. भात बीज प्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी कक्षेतील दापोली, खेड आणि मंडणगड या तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाने विकसित व संशोधित केलेल्या विविध पिकांच्या वाणांचे प्रदर्शन त्याचबरोबर शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर जतन केलेल्या विविध पिकांच्या जातींचेही प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच या दिवशी शेतकऱ्यांना विक्रीसाठी बियाणेही उपलब्ध होणार आहे. बियाण्याची आगाऊ नोंदणीही करून घेण्यात येणार आहे.

या प्रसंगी शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन तालुक्‍यातील निवडक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक संजय भावे, संशोधन संचालक पराग हळदणकर, शिक्षण संचालक सतीश नारखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे उपस्थित राहणार आहेत.

यावर्षी प्रथमच साजरा होणाऱ्या बीज महोत्सवास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. विविध पिकांच्या स्थानिक जातींचे वाण प्रदर्शनात प्रदर्शित करावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com