थकबाकी न भरल्यास जप्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

राजापूर - मार्च एंडिंग जवळ येताच मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. थकबाकीदारांकडून विविध प्रकारच्या करांची असलेली थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दोन वर्षांतील ६५ थकबाकीदारांकडील सहा लाख ८१ हजारांची वसुली थकली आहे. त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत थकबाकीदारांनी रक्कम भरणा न केल्यास त्यांच्या नळजोडण्या तोडण्यात येणार आहेत. 

थकीत कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र पथकांची नेमणूक केली आहे. मालमत्ता, पाणीपट्टी यासह विविध प्रकारच्या कराची थकीत रक्कम ठेवणाऱ्या लोकांशी या विशेष पथकांमार्फत संपर्क साधला जात आहे. थकबाकीदारांनी रक्कम न भरल्यास मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीसाठीही पथकाने आक्रमक पवित्रा घेतला असून, नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांत थकीत रक्कम भरणा न केल्यास नळ जोडणी तोडण्यात येणार आहे.

२०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात ६५ लोकांनी पालिकेचा कर थकवला आहे. त्यांच्याकडे ६ लाख ८१ हजार रुपये थकीत आहेत. विशेष पथकाने शहरामध्ये धडक मोहीम राबवताना तब्बल ७० हजारांची वसुली केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या या कारवाईमुळे अन्य थकबाकीधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ज्या नागरिकांना अद्यापही थकीत रक्कम भरणा केलेली नाही, त्यांनी तातडीने प्रशासनाकडे रक्कम भरणा करावी असे आवाहन मुख्याधिकारी नयना ससाणे यांनी केले आहे.   

सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू
थकीत रकमेच्या वसुलीसाठी विशेष पथके नेमलेल्या पालिका प्रशासनाने रक्कम भरणा करण्यासाठी सुटीच्या दिवशीही पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी नागरिकांकडून कराची रक्कम रोखीसह चेकद्वारे स्वीकारली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: seized by arrears