Selection Of Suresh Thakur For Konkani Seminar Sindhudurg Marathi News
Selection Of Suresh Thakur For Konkani Seminar Sindhudurg Marathi News

कोकणी परिसंवादासाठी सुरेश ठाकूर यांची निवड 

तळेरे ( सिंधुदुर्ग) - अखिल भारतीय कोकणी परिषदेच्यावतीने 8 ला कोकणी भाषेचा 82 वा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. यातील परिसंवादासाठी आचरा येथील लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना निमंत्रित केले आहे. ते कोवीड - 19 नंतरची कोकणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

दरवर्षी हा उत्सव पणजी गोवा येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावर्षी कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन इंडियन रेड क्रॉस हॉल महानगरपालिका पणजी गोवा येथे मेघना शेटगावकर, संचालक राजभाषा संचलनालय, गोवा यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती उषा राणे अध्यक्ष अखिल भारतीय कोकणी परिषद यांनी दिली. याचा शुभारंभाचा कार्यक्रम मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोवीड-19 नंतरची कोकणी या विषयावर ऑनलाईन परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात देश-परदेशातील कोकणी भाषातज्ज्ञ सहभागी केले आहेत. मालवणीतून विचार मांडण्यासाठी सुरेश ठाकूर (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण) यांना निमंत्रित केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com