सेटटॉप बॉक्‍स नसेल तर ब्लॅकआऊट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

राजापूर - गतवर्षीपासून डिजिटलायझेशन करण्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने तालुक्‍यातील शहरासह दुर्गम भागातील सुमारे सोळाशेहून अधिक टीव्ही ब्लॅकआऊट होणार आहेत. केंद्र सरकारने अखेरच्या चौथ्या टप्प्यात केबल डिजिटलायझेशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना सेट टॉप बॉक्‍स खरेदी करावा लागणार आहे. सद्यस्थितीध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे 53 टक्के सेट टॉप बॉक्‍स बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

टिव्हीवर अनेक मराठी, हिंदी वा इंग्रजी चॅनेलवरील कार्यक्रम पाहता यावेत म्हणून घरोघरी केबल घेतलेली दिसते. घरोघरी केबल असली तरी केबलच्या जोडणीची नोंद संबंधित केबलचालकाने शासन दरबारी केली नसल्याने त्यातून हजारो रुपयांचा करमणूक कर बुडतो. त्यामुळे केंद्र शासनाने डिजिटालयझेशन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी तालुक्‍यात सुरू झाली आहे. यामध्ये विविध करमणुकीची चॅनेल पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल जोडणीऐवजी सेट टॉप बॉक्‍स बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर चुकविणाऱ्या केबलचालकांना हादरा बसला आहे. सेट टॉप बॉक्‍स वा डीटीएचशिवाय ग्राहकांपुढेही पर्याय नाही. यापूर्वी केबल चालकांकडून प्रत्यक्षात दिलेल्या जोडण्यांपेक्षा खूप कमी संख्येने जोडण्यांवर कर भरला जात होता; मात्र डिजिटालयझेशनमुळे प्रत्येक जोडणीची शासनाकडे माहिती येत असल्याने करचुकवेगिरीला लगाम बसणार आहे. सध्या तालुक्‍याच्या शहरी भागात 1 हजार 329, तर ग्रामीण भागात 1 हजार 629 केबल जोडण्या आहेत. त्यापैकी 53 टक्के केबलधारकांनी सेट टॉप बॉक्‍स बसवून घेतला आहे. उर्वरित ठिकाणी सेटटॉप बॉक्‍स बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

Web Title: The settop box is not black-out