सात महिन्यांत एसटीला जिल्ह्यात 19 कोटींचा तोटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

अलिबाग - रस्त्यांची दुरवस्था, प्रवाशांची घटलेली संख्या, डिझेलचे वाढलेले दर यामुळे राज्य परिवहन मंडळ अडचणीत सापडले आहे. रायगड जिल्ह्यात एसटीला यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत 19 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

खासगी वाहनांची वाढलेली संख्या, ग्रामीण भागातही पर्यायी वाहतूक सुरू झाल्याने एसटीचे प्रवासी घटले आहेत. त्यातच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. खराब रस्त्यांमुळे बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. डिझेलचे दरही वाढले आहेत. त्याप्रमाणात प्रवासी टिकीट दर वाढलेले नाहीत. याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाल्याचा दावा अधिकारी करतात. 
पेण येथील विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात सर्वाधिक दोन कोटी 28 लाख रुपयांचा तोटा अलिबाग आगाराला झाला आहे. 

Web Title: Seven months net loss of 19 ST districts