व्वा...आणखी सात जण पडले कोरोनाला भारी

Seven patients became coronavirus free konkan sindhudurg
Seven patients became coronavirus free konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी 7 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 179 झाली आहे, तर जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 राहिले आहेत. दरम्यान, अजून 28 कोरोना संशयित उपचाराखाली आहेत. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन सक्रिय असून यांतील 20 झोन कणकवली तालुक्‍यात आहेत. 

जिल्ह्यात काल (ता. 5) रात्री आणखी एक कोरोना रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 243 झाली होती. हा नव्याने सापडलेला रुग्ण कणकवली तालुक्‍यातील नाटळ येथील आहे. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन आहेत. यांतील 20 कणकवली, देवगड आणि मालवणमध्ये प्रत्येकी 3, वैभववाडी आणि कुडाळ येथे प्रत्येकी दोन अशाप्रकारे कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 40 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण नमुने संख्या 4 हजार 157 एवढी झाली आहे. यांतील 4 हजार 104 अहवाल प्राप्त झाले आहेत.

प्राप्त अहवालात 3 हजार 823 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 243 बाधित आले आहेत. बाधितांपैकी 179 बरे होऊन घरी परतले आहेत. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक उपचारासाठी मुंबई येथे गेले आहेत. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 आहेत. जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 86 रुग्ण उपचार घेत आहेत. 

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 31 कोरोनाबाधित, तर 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित आणि 2 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 14 बाधित उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यातील आरोग्य पथकाने एक हजार 229 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली.

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 50 व्यक्ती कमी झाल्याने 15 हजार 441 व्यक्ती राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये एक व्यक्ती वाढल्याने 32 संख्या झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 53 व्यक्ती कमी झाल्याने 12 हजार 915 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये मात्र 63 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 2 हजार 495 झाली आहे, तर 2 मे पासून जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या एक लाख 22 हजार 817 झाली आहे. 

आणखी दोन कंटेन्मेंट झोन 
मालवण तालुक्‍यातील आचरा-पिरावाडीचा 300 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण - कोष्टीवाडी येथील 1 किलोमीटर परिघातील 249 घरे, 292 कुटुंबे, तसेच 1 हजार 161 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 18 जुलैला रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com