दिलासादायक ! सात रुग्णांची कोरोनावर मात

Seven Patients Overcome Corona Ratnagiri Marathi News
Seven Patients Overcome Corona Ratnagiri Marathi News

दाभोळ ( रत्नागिरी ) - दापोली तालुक्‍यातील 7 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून ते कोरोनामुक्त झाल्यावर आज त्यांना उपजिल्हा रुग्णलयातून घरी सोडण्यात आले. 

दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 कोरोनाबधित रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 7 जणांना आज घरी सोडण्यात आले. आता 10 जणांवर उपचार सुरू आहेत. आज ज्या 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्या कोरोनाबाधित रुग्णांना 10 ते 14 मे या कालावधीत दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे रुग्ण बोरिवली, कोळबांद्रे, भोपण, कळकी, सडवे, साकुर्डे येथील असून ते मुंबई येथून आले होते. या रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. शिवदास चव्हाण, डॉ. डी. डी. जाधव, डॉ. रामतीर्थ चौगुले, डॉ. कुणाल मेहता, डॉ. समीक्षा बुटाला, डॉ. उर्मिला, डॉ. श्राव्या शेट्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिराजदार तसेच नर्सिंग स्टाफने उपचार केले.

यावेळी बोलताना रुग्णांनी आम्ही येथे जेव्हा उपचारासाठी दाखल झालो, तेव्हा आमच्या मनात भीती होती. पण येथील उपचार घेऊन आम्ही बरे झालो असून आमची भीती नाहीशी झाली आहे. या सर्वांनी उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांबद्दल व सर्व स्टाफ बद्दल कृतज्ञाता व्यक्त केली. या सातही बरे झालेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात टाळ्या वाजवून रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com