कुडाळच्या सभागृहात सतरा नवीन चेहरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कुडाळ - येथील पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवादपणे भगवा फडकवला. यात १८ पैकी १७ नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे. सभापतिपदावर पावशीचे राजन जाधव विराजमान होणार आहेत. या लोकप्रतिनिधींनी कुडाळच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

काँग्रेसच्या ताब्यातील पंचायत समिती शिवसेनेने खेचत एकहाती सत्ता मिळविली. १८ पैकी १० जागांवर शिवसेना, सहा जागांवर काँग्रेस, तर दोन जागांवर भाजपने खाते खोलले. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेला शून्यावर समाधान मानावे लागले. सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडल्याने पावशी पंचायत समितीचे शिवसेनेचे राजन जाधव या पदी बसणार आहेत. 

पावशी गावाला सातत्याने सभापतिपद मिळाले आहे. निवडून आलेल्या अठरा उमेदवारांमध्ये १७ उमेदवार नवीन आहेत. आंब्रड मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे अरविंद परब यांनी यापूर्वी उपसभापतिपद भूषविले आहे. त्यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला तरी ते स्वतःच्या जनसंपर्कावर निवडून आले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

उर्वरित नवीन चेहऱ्यांमध्ये बाळकृष्ण मडव (काँग्रेस-जांभवडे), शीतल कल्याणकर (शिवसेना-आवळेगाव), नूतन आईर (काँग्रेस-वेताळबांबर्डे), सुप्रिया वालावलकर (काँग्रेस-ओरोस बुद्रूक), गोपाळ हरमलकर (भाजप-कसाल), जयभारत पालव (शिवसेना-डिगस), राजन जाधव (शिवसेना-पावशी), संपदा पेडणेकर (शिवसेना-पिंगुळी), मिलिंद नाईक (काँग्रेस-साळगाव), मधुरा राऊळ (शिवसेना-घावनळे), भास्कर नाईक (काँग्रेस-उत्तर), प्राजक्ता प्रभू (शिवसेना-नेरुर दक्षिण), डॉ. सुबोध माधव (शिवसेना-पाट), अनघा तेंडोलकर (शिवसेना-तेंडोली), श्रेया परब (शिवसेना-गोठोस), शरयू घाडी (शिवसेना-माणगाव), स्वप्ना वारंग (काँग्रेस-झाराप) यांचा समावेश आहे. 

विशेषतः बरेच उमेदवार उच्चशिक्षित पदवीधर आहेत. मतदारांचे प्रश्‍न हे सर्वजण कशाप्रकारे हाताळतात हे फार महत्त्वाचे आहे. आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व मानून सत्ताधाऱ्यांचे नवीन चेहरे पंचायत समितीत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या पंचायत समिती राजवटीत प्रलंबित प्रश्‍न, इतर समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ही अपेक्षा मतदार वर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त विकासकामांवर चर्चा झाली. टक्केवारीवर चर्चा झाली. जनतेच्या प्रश्‍नापेक्षा लोकप्रतिनिधी विकास निधीवरच जास्त बोलले. आता नवीन चेहऱ्यांकडून मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी त्याची नियोजनबद्ध पूर्तता करणे गरजेचे आहे. 
तळागाळात त्यांनी शासनाच्या विविध योजना पोचविल्या पाहिजेत. योग्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी कामगिरी बजावली पाहिजे. पारदर्शी कारभाराची अपेक्षा मतदारांतून व्यक्त होत आहे.

श्रेया परब यांना उपसभापतिपद शक्‍य
शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला आघाडीप्रमुख श्रेया परब या गोठोसमधून विजयी झाल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत संघटना बांधली. दरम्यानच्या कालावधीत मोठ्या अपघातातून त्या बचावल्या. काही महिने त्या गंभीर जखमी असल्याने पक्षापासून लांब होत्या; मात्र पक्षावरील निष्ठा कायम होती. त्यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी त्यांच्या संघटना बांधणीचे निश्‍चितच कौशल्य म्हणावे लागेल. विजयी झाल्याने त्यांच्या कार्याचे चीज झाले. दहांमध्ये त्या ज्येष्ठ असल्याने उपसभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल, अशी शक्‍यता आहे.

Web Title: Seventeen new corporator in the auditorium of Kudal