शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

वैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा ताफा, रस्त्यावर फुलांचा गालीचा आणि अस्थीकलशाच्या दर्शनाकरीता नागरिकांची झालेली गर्दी अशा भावपुर्ण वातावरणात आज ता.२० दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास शहीद मेजर कौस्तुभ राणेंचा अस्थीकलश संभाजी चौकात दाखल झाला. कलशाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो तरूणांनी मेजर कौस्तुभ राणे अमर रहे, भारत माता कि जय, वंदे मातरम, जबतक सुरज चाँद रहेगा कौस्तुभ राणे नाम रहेगा अशा घोषणा देवुन वैभववाडीवासीयांनी शहीद राणेंना सलामी दिली.

शहीद मेजर राणेंचा अस्थीकलश येथील संभाजी चौकात दर्शनाकरीता ठेवण्यात आला होता. अस्थीकलश आल्यानतंर येथील पोलिसांनी त्यांना सलामी दिली आणि पोलीस विभागाच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानतंर  अस्थीकलश नागरिकांच्या दर्शनाकरीता ठेवला. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत, भाजपा नेते अतुल रावराणे, सभापती लक्ष्मण रावराणे, नायब तहसिलदार गमन गावीत, दीपा गजोबार, संजय चव्हाण, भालचंद्र साठे, नासीर काझी, सज्जन रावराणे, रवींद्र रावराणे यांच्यासह शेकडो नागरिकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेवुन पुष्पहार अर्पण केले.

मेजर शहीद राणेंचा अस्थीकलश घेवुन त्यांचे काका विजय रावराणे हे मुबईहुन कोल्हापुर मार्गे आज सकाळी करूळ येथे दाखल झाले. तेथे असलेल्या शेकडो नागरिकांनी शहीद राणे अमर रहेच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यानतंर अस्थीकलश ग्रामपंचायत कार्यालयानजीक दर्शनाकरीता ठेवण्यात आला. तेथे करूळ आणि परिसरातील शेकडो लोकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. त्यानतंर एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकामध्ये अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. तेथुन हा कलश येथील संभाजी चौकात दाखल झाला. त्यामुळे सकाळपासुन प्रतिक्षेत असलेल्या शेकडो तरूणांनी अमर रहे अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहेच्या घोषणा देवुन त्यांना तालुका वासीयांच्यावतीने सलामी दिली. तेथे अस्थीकलश दर्शनाकरीता ठेवण्यात आला. हजारो तालुकावासीयांनी दर्शन घेतले. खांबाळे, आर्चिणे, सांगुळवाडी, अरूळे आणि त्यानतंर सडुरे येथे हा कलश लोकांच्या दर्शनाकरीता ठेवण्यात आला. प्रत्येक ठिकाणी शेकडो लोक उपस्थित राहीले होते. ज्या ज्या गावात अस्थीकलश नेण्यात आला त्या त्या ठिकाणी अमर रहेची जयघोष करण्यात आला

Web Title: Shaheed Major Kaustubh Rane remains immortal