मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील - पवार

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मालवण - सिंधुदुर्गात जशी टुरीझमची, हाॅर्टिकल्चरची चर्चा होते तशीच मत्स्यशेतीची चर्चा होऊ शकते. या जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्यासाठी हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही सत्तेत नसलो तरी या व्यवसायातील उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाला आग्रहाची भूमिका घेण्याचे काम करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवली (ता. मालवण) येथे केले.

जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार यांनी आज सकाळी देवबाग येथून बोटीने खाडीपात्रातून सफर केली त्यानंतर देवली येथील उदय अ‍ॅक्वा फार्म या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रदेश चिटणीस व्हिक्टर डांटस, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, नगरसेवक अबिद नाईक, तालुकाध्यक्ष डॉ. विश्‍वास साठे, शहराध्यक्ष आगोस्तीन डिसोझा उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी कोळंबी प्रकल्पाची पाहणी करत माहिती घेतली. श्री. पवार म्हणाले, देवली येथील उदय अ‍ॅक्वा फार्मने कोळंबी प्रकल्प सुरू केल्यानंतर हा प्रकल्प यशस्वी होईल का अशी शंका होती. मात्र व्हिक्टर डांटस यांच्या सहकार्याने ही शंका दूर केली. चांगले बीज घेतले तसेच आवश्यक ती काळजी घेतली. बीज चांगले घेतले आणि मार्केटिंगची चांगली व्यवस्था झाल्यास आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. आता हे सिद्ध झाल्यावर सरकारची जबाबदारी आहे.

ज्या जमिनी शेतीला उपयुक्त नसतील अशा जमिनी यशस्वी उद्योजकांना द्यायला हव्यात. जिल्हा बँकेने त्यांना अर्थसाह्य करण्याची चांगली भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका राज्य सरकारने घेतली तर हा व्यवसाय निश्‍चितच वाढेल

- शरद पवार 

मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे आहे ते नागपूर येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा मत्स्य व्यवसायच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ते हलवू नये. शिवाय कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ देण्यात यावे अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आली. याप्रश्‍नी सरकारचे लक्ष वेधू असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Sharad Pawar comment