शरद पवार यांचा नातवांच्या सोबत कोकण दौरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सावर्डे - गेले तीन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांच्या समवेत आम्ही तीन भावंडेही आहोत. पवार यांच्यासोबत प्रथमच आम्ही अभ्यास व अनुभव घेत आहोत, अशी माहिती माहिती बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी दिली.

सावर्डे - गेले तीन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांच्या समवेत आम्ही तीन भावंडेही आहोत. पवार यांच्यासोबत प्रथमच आम्ही अभ्यास व अनुभव घेत आहोत, अशी माहिती माहिती बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी दिली.

शरद पवार यांच्या कोकण दाैऱ्यात त्यांच्या सोबत रोहित राजेंद्र पवार, युगेंद्र श्रीनिवास पवार आणि पार्थ अजित पवार हे ही सहभागी झाले आहेत. या दाैऱ्याबद्दल रोहित पवार पत्रकारांसोबत बोलत होते. पार्थ हा अजित पवार यांचा मुलगा तर रोहित हे पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू तर युगेंद्र हे अजित पवार यांचे धाकटे बंधू यांचे चिरंजिव आहेत. 

श्री रोहित पवार म्हणाले की या दाैऱ्यातून खुप समाधान आणि उत्साह मिळते. यापूर्वी शरद पवार यांच्यासोबत आम्ही परदेशी दौरा केला होता. पण कोकणचा पहिलाच दौरा आहे  रत्नागिरीत आम्ही कधी येत नाही. मात्र शरद पवार यांच्या समवेत येण्याचा योग आला. कोकणातील काही वास्तूंची उद्‌घाटने, काही राबविलेल्या योजना या त्यांनी आम्हा भावंडांना सांगितल्या.

आमच्यासाठी शरद पवार यांच्या बरोबर गाडीतून फिरणे ही एक पर्वणीच आहे. काही किस्से, आठवणी सांगताना त्यांची दुरदृष्टी आणि निर्णय घेण्याची क्षमता यागोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या.

- रोहित पवार 

श्री, रोहित पवार म्हणाले, हॉर्टीकल्चरचे अर्थकारण आणि त्याच्या माध्यमातून कोकणचा होत असलेला विकास याबाबत शरद पवार यांनी जे सांगितले त्यामागील विचार यागोष्टी अतिशय समजून घेण्यासारख्या आहेत. त्याबरोबर समुद्रातील कोळंबी व्हरायटी का आणावी लागली. कोकणचा परिसर हा त्यांना आवडतो. समुद्राला टुरिझमची जोड लाभल्यास कोकणचा विकास कसा होवू शकतो. अशा जुन्या गप्पा गोष्टी आमच्या सोबत गाडीतून चालत आहेत. 

गाडीतून प्रवास करत असताना त्यांना एखादी गोष्ट दृष्टीस पडली की ते त्याविषयी बोलू लागतात. मग आम्ही त्यांना प्रश्‍न विचारतो. अशा अनेक गोष्टीने आमच्या प्रवासात धमाल येत आली.

- रोहित पवार

सत्तेत असताना शरद पवार यांनी घेतलेले निर्णय त्यांची अमंलबजावणी आणि त्याचा सर्वसामान्यांना होणारा फायदा त्यांनी सांगितला. गणपतीपुळे येथे त्यांनी राबविलेली न्याहरी निवास योजनेमुळे येथे रोजगार निर्मिती झाली होती. अशा कित्येक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या, असेही रोहित पवार यांनी सांगितले. 

रोहित, पार्थ व युगेंद्र लक्षवेधी 
पवार यांच्या सोबत कोकण दौऱ्यावर आलेली रोहित, पार्थ व युगेंद्र ही भावंड अतिशय नम्र आणि शांत दिसून आली. त्यांच्या चेहऱ्यावर ना गर्व ना अभिमान सामान्यांच्या सारखे ते लोकांच्यांत मिसळून फिरत होती. राजकीय पटलावर उगवते राजकीय तारे असलेले पवार बंधू सर्वाचे लक्षवेधी ठरले. 

Web Title: Sharad Pawar Konkan Tour Special