लांजात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दा फाश 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

जितेंद्र चव्हाण हा प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे

लांजा - लांजातील खवले मांजर तस्करी प्रकरणी 4 जणांचे रॅकेट उधळण्यात लांजा पोलिसांना यश आले असून आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान गोळवशी जंगलात खवले मांजर मारल्याची माहीती पुढे आली आहे. अटकेतील दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 
जितेंद्र चव्हाण हा प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

जितेंद्र चव्हाण(साटवली), स्वप्नील भुवड(सडवली), प्रमोद बाईंग(गोळवशी),आणि अन्य एकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गोळवशी येथे खवले मांजर मृत अवस्थेत असल्याची माहिती स्वप्नील भुवड, प्रमोद बाईंग यांनी जितेंद्र चव्हाण याला दिली. जितेंद्र याने खवले विकत घेणारे एक कनेक्शन असल्याचे या दोघाना सांगितले. लाखों रुपये मिळतील असे सांगून ते खवले मला द्या मी तुम्हाला चांगला फायदा करून देतो. तिघांमधील हा व्यवहार लीक झाल्याने याची माहिती पोलिस गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरीला देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषणने सापळा रचून जितेंद्र याला रूण फाटा येथे रंगेहाथ पकडले. लांजा पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विकास पवार यांनी कुशलतेने खवले मांजर तस्करी प्रकरण उलगडण्यात यश मिळवले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF  या संस्थेनेही म्हटले आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी तर खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. 

हे पण वाचा - फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना राहा दक्ष ; विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

गेल्या काही दिवसांपासून खवल्या मांजर तस्करी प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून या गुन्ह्यातील संशयित आरोपी जितेंद्र चव्हाण हा राजकीय पक्ष पदाधिकारी आहे. संशयितांचे पितळ उघडे पडल्याने 'रक्षकच बनला भक्षक', अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The shell of the racket that smuggled the scaly cat into the lanyard