सुधागड तालुक्यात ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शेकाप अव्वल

अमित गवळे
गुरुवार, 5 जुलै 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका २७ मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून अालेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.३) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका २७ मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून अालेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.३) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली.

या निवडणुकीत 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडून अाले होते. तर मंगळवारी (ता.3) रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील ९ ग्रामपंचायतीत उपसरपंचपद मिळवत शेतकरी कामगार पक्ष अग्रस्थानी राहिला आहे. यामध्ये नांदगाव वैशाली दिघे,गोमाशी खैरे, पाच्छापूर चंद्रकांत शिंदे, कळंब संजना चव्हाण, नवघर श्रीरंग साळवी, महागाव वैभव पवार, दहिगाव रामचंद्र जाधव,राबगाव किसन हंबिर व रासळ धनंजय म्हस्के हे शे.का.पक्षाचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. तर परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रिपांईचे दिपक महादू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉग्रेस पक्षाचे राजेश सिंगाडे यांची वर्णी लागली. नाडसूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी परिवर्तन नागरी आघाडीचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली. तर भार्जे उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण कालेकर यांची निवड झाली. यावेळी शे.का.प नेते सुरेश खैरे म्हणाले की सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असा सर्वांगिण विकास साधला आहे. जनतेला शे.का.पक्षावर दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी खैरे यांनी दिली.

Web Title: shetkari kamgar party is on top in sudhagad tehsil elections