नांदगाव व गोमाशी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्ष बिनविरोध

अमित गवळे
गुरुवार, 24 मे 2018

पाली : सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून अाले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११ ग्रामपंचायतींचीच निवडणुक रविवारी (ता.२७) पार पडणार अाहे.

नांदगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सोनल संजिव ठकोरे तर गोमाशी ग्रामपंचायत सरपंचपदी पुजा प्रविण पवार या बिनविरोध निवडून अाल्या अाहेत. शे.का.पक्षाच्या वतीने पक्षाच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना सुधागड तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शे.का.पक्षाची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचा दावा शेकाप नेते सुरेश खैरे यांनी केला होता.

बिनविरोध निवडून अालेले उमेदवार
नांदगाव ग्रामपंचायत

सोनल संजिव ठकोरे (सर्वसाधार स्त्री) या सरपंचपदी, संजना संजय वाघमारे (अनु- जमाती स्त्री), अरविंद काशीराम फणसे( सर्वसाधारण), वैशाली दिनेश दिघे( सर्वसाधारण स्त्री),तसेच गणपत एकनाथ भणगे(सर्वसाधारण), सरिता भिखुनाथ म्हसकर (सर्वसाधारण स्त्री), प्राची परेश खामकर(ना.मा.प्र) हे बिनविरोध निवडून आले आहेत.

गोमाशी ग्रामपंचायत
सरपंचपदी पुजा प्रविण पवार (अनुसुचीत जाती) या सरपंचपदी, तसेच भुषण भास्कर सुतार, नंदीनी ज्ञानेश्वर जाधव, पल्लवी हरिदास गायकवाड, दिपाली जितेंद्र खैरे,संजय वसंत भालेराव, शर्वरी चंद्रशेखर जंगम, शरद राजाराम उतेकर आदी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

Web Title: Shetkari Kamgar Party wins Nandgaon and Gomashi elections